• Sun. Mar 8th, 2026

    ‘Dhananjay Munde यांना अर्धांगवायूचा झटका आलेला’, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

    ‘Dhananjay Munde यांना अर्धांगवायूचा झटका आलेला’, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

    Dhananjay Munde Paralysis stroke : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना बोलता येत नाही, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना अर्धांगवायूचा झटका आला होता, अशी माहिती आता समोर येत आहे. धनंजय मुंडे यांना अर्धांगवायूच्या झटक्यामुळे त्यांना बोलताही येत नसल्याची माहिती आहे. राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. बीडच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे गैरहजर राहिल्याचा प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे यांची तब्येत बरी नसून त्यांना बोलताही येत नसल्याचं सांगितलं आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    धनंजय मुंडे यांना नुकतंच बेल्स पाल्सीची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले होते. यानंतर धनंजय मुंडे नुकतेच परळीत कामालादेखील लागल्याचं बघायला मिळालं होतं. यानंतर आता धनंजय मुंडे यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना बोलता येत नसल्याचं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे.

    ‘त्यांना बोलता येत नाही, डोळे देखील वाकडे झाले’

    “धनंजय मुंडे यांची तब्येत ठीक नाही. त्यांना पॅरेलेसिस झालाय. त्यांना बोलताही येत नाही. डोळे देखील वाकडे झाले आहेत. आपण दुसरंच बघतो. ते मुंबईला देखील बैठकीला येतात. ते फॅशन शोला दिसले असतील. जवळच्या माणसाने आग्रह केला असेल. त्यामुळे गेले असतील”, असं बाबासाहेब पाटील म्हणाले आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed