Mumbai BJP: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभेत दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं आता मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
नाशिकमध्ये झालेल्या शिवसेना उबाठाच्या निर्धार शिबिरात उद्धव ठाकरेंनी भाजपच्या बूथ व्यवस्थापनाचं कौतुक केलं. भाजपच्या संघटनात्मक रचनेबद्दल ठाकरे सविस्तर बोलले. आता ठाकरेंना पराभूत करण्यासाठी हीच यंत्रणा कामाला लागली आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी ३ मंडल अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. १०० बूथमागे १ मंडल अध्यक्ष या सुत्रानुसार मुंबईत ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी १०८ मंडल अध्यक्ष निवडले जाणार आहेत. मुंबई प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत छाननी करण्यात आलेल्या मंडल अध्यक्षांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
Uddhav Thackeray: मुद्दाम फोटो आणलाय! ठाकरेंनी भाजपच्या गोटातील खडानखडा माहिती सांगितली; तपशील दिला कोणी?
मुंबई भाजपमध्ये पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख, वॉर्ड अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष अशी चढती रचना आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला ऐतिहासिक यश मिळाल्यानं निकालानंतर जोरदार इन्कमिंग झालेलं आहे. त्यामुळे एका विधानसभा मतदारसंघामागे ३ मंडल अध्यक्ष पदं तयार करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या पदांवर ३५ ते ४५ वर्ष वयोगटातील तरुणांना आणि महिलांना संधी दिली जाईल.
Uddhav Thackeray: ठाकरेंकडे 55 हजारांची फौज तयार, आता मुंबईत लढाई आरपार; फिल्डींग लागली, तरीही अडचण का वाढली?
मंडल अध्यक्षांच्या निवडीसाठी भाजपनं प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निरीक्षक पाठवले होते. त्यांनी एका जागेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा ३ नावांची शिफारस केलेली आहे. १६ एप्रिलपर्यंत ही नावं बंद पाकिटात भरुन कोअर कमिटीकडे पाठवण्यात आली. कोअर कमिटीनं नावांची छाननी केली आहे. मंडल अध्यक्ष पदावर नियु्क्ती करताना काही प्रमुख निकष असणार आहेत. इच्छुक व्यक्तीची सामाजिक, भौगोलिक पार्श्वभूमी, त्यानं पक्षासाठी दिलेलं योगदान यांचा विचार होईल.

