Parbhani Man dies of Heat Stroke : दुपारच्या वेळेस जवळच्या मैदानावर समीर पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीची तयारी करत होता. त्यानंतर अचानक अस्वस्थ वाटू लागले म्हणून तो घरी परतला.
याविषयी विस्तृत माहिती अशी की, समीर खान हा जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक जावक विभागात कार्यरत होता. मूळ रोजगार हमी योजनेवर कंत्राटी कर्मचारी म्हणून त्याची नियुक्ती होती. सोमवारी सायंकाळच्या सुमारास तो घरी गेला. प्रकृती अस्वस्थ जाणवत असल्याने समीरला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला अतिदक्षता विभागामध्ये हलविण्यात आले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. सोमवारी सायंकाळच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. समीरचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जिंतूर रोडवरील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला. त्याचे लग्न दीड वर्षापूर्वीच झाले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, चार महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. समीर खान हा कंत्राटी तत्वावर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होता. तरुणाच्या अचानक मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.Pune Crime : मी १२०० फूट खोल खाणीत जातोय, मुलीला शेवटचा मेसेज; पुण्याचे व्यावसायिक लक्ष्मण शिंदेंच्या हत्येचं गूढ कसं उकललं?
पोलीस बनण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण
समीर खान हा जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात 8 वर्षापासून CDEO (क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर) या पदावर नियुक्त होता. दरम्यान, आवक जावक विभागात तो 2018 पासून कार्यरत होता. मागील काही दिवसांपासून तो पोलीस भरतीची तयारी देखील करत होता.Mumbai Accident : अरे चेतन हळू चालव ना! प्रवाशांची गयावया, तरी चालकाने गाडी दामटवली; मुंबईत भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
सोमवारी (दि.14) डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने दुपारच्या वेळेस जवळपास तो मैदानावर पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीची तयारी करत होता. त्यानंतर अचानक अस्वस्थ वाटू लागले म्हणून तो घरी परतला. दरदरून घाम येऊन अंग गरम वाटल्याने नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने पोलिस बनण्याचे समीरचे स्वप्न अपूर्णच राहिले.