बीडच्या माजलगाव येथील नारायण फपाळ नामक व्यक्तीने बाबा आगे नामक व्यक्तीवर… कोयत्याचे वार करत खून केल्याची घटना भर दुपारी घडली आहे. या प्रकरणात असलेला आरोपी नारायण फपाळ हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.जखमी बाबा आगे याला रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.आरोपी अटक असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी सांगितले.