• Fri. Apr 25th, 2025 12:30:59 PM
    आईच ठरली वैरीण! मुलीचा नको तो व्हिडिओ काढला, प्रियकराला पाठवला अन् व्हायरलही…; पुण्यातील संतापजनक घटना

    Pune Crime News : पुण्याला जणू आता गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. दिवसाढवळ्या होणारे खून, बलात्काराच्या घटना अशा अनेक गुन्ह्यांनी जसे पुण्याला ढवळून निघाले आहे. आता एका आईनेच स्वत:च्या मुलीसोबत संतापजनक कृत्य केले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : पुण्याला जणू आता गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. दिवसाढवळ्या होणारे खून, बलात्काराच्या घटना अशा अनेक गुन्ह्यांनी जसे पुण्याला ढवळून निघाले आहे. आता एका आईनेच आपल्या मुलीसोबत संतापजनक कृत्य केले आहे. महिलेने स्वत:च्याच मुलीचा अश्लील व्हिडिओ काढून तो प्रियकराला आणि नातेवाईकाला पाठवला आहे. एवढ्यावरत न थांबता तिने आपल्या अल्पवयीन मुलीसोबत स्वतःच्या प्रियकराला अनैतिक संबंध ठेवायला लावले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नराधम आईसह तिच्या प्रियकरालाही बेड्या ठोकल्या आहेत.

    वृत्तानुसार, पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. भारती विकास कुऱ्हाडे आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोघांनी मुलीचे व्हिडिओ व्हायरल केले होते. शनिवारी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी तात्काळ दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसर हादरला आहे.
    बेपत्ता तरुणीचा थेट मृतदेह आढळला, पुण्यात खळबळ; ‘तो’ CCTV आला समोर, तपासाला वेग
    दरम्यान, लेकीला आईच्या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती पडले होते. यामुळे ते उघड करण्याच्या तयारीत लेक होती. तिने याबद्दल त्यांच्या घरमालकालाही सांगितले. वैरीण आईला याबद्दल समजताच तिने लेकीचे नको त्या अवस्थेत व्हिडिओ काढले. पुढे तिने ते व्हिडिओ प्रियकरासह आपल्या नातेवाईकांनाही पाठवले. नंतर तिने प्रियकराला लेकीशी अनैतिक संबंध ठेवण्यासही सांगितले. व्हिडिओ व्हायरल करताच दोघेही नराधम पसार झाले होते. बिबवेवाडी पोलिसांनी शनिवारी दोन्ही नराधमांना अटक केली आहे.

    अशीच एक चीड आणणारी घटना शुक्रवारी समोर आली होती. एका विकृत इसमाने कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. आरोपीचे नाव हलीमुद्दीन शेख असून तो हडपसरमधील हांडेवाडीत वास्तव्यास होता. तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. कुत्र्याचा मालक काही कामानिमित्त परगावी गेला असताना ही संतापजनक घटना घडली होती. पोलिसांनी आरोपीच्या कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा तो पश्चिम बंगाल येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले होते.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed