पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यदनगर भागात कुख्यात गुंड टिपू पठाण याच्यासह त्याच्या साथीदारांची पुणे पोलिसांनी धिंड काढली. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात गुंड टिपू पठाण हा त्याच्या साथीदारांसह पैश्यांची उधळण करत नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत टिपू आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. यानंतर काल पोलिसांनी पठाणची त्याची दहशत असलेल्या भागातूनच धिंड काढली.. आणि घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असं म्हणत नागरिकांना आवाहन केलं.. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.