Prasad Lad On Sanjay Raut : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. या आरोपाला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले. हेच नाही तर प्रसाद लाड यांनीही संजय राऊतांवर टीका केली आहे.
उदय सामंत म्हणाले की, माझा उलटा प्रश्न आहे की, आजपर्यंत अमित शाह यांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिले होते? कोणीही उपस्थित राहिले नव्हते. स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन रायगडावर जात नाहीत, कारण तिथे चालावे लागते. मग अमित शहा तिथे आले आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा फक्त महाराष्ट्राने नाही तर जगाने सांभाळला पाहिजे अशी भूमिका मांडली.भरत गोगावलेंना एकनाथ शिंदेंचा फोन, तातडीने मुंबईला रवाना, पडद्यामागील घडामोडींना वेगपुढे उदय सामंत म्हणाले, देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असा उल्लेख अमित शहा यांनी केला. पण काही लोकांना बदनामी करण्याची हाैस असते. यावर बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, ज्यापद्धतीने संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर आरोप केले. त्यावरून मला वाटते की, संजय राऊतांचे डोके फिरले आहे. खऱ्या अर्थातने अमित शहांनी रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केला.
भरकटलेल्या संजय राऊतांनी त्यांच्यावर आरोप करणे बंद करावे. तो कोणत्याही पद्धतीचा राजकीय दाैरा नसून हा छत्रपतींचा सन्मान करण्याचा दाैरा होता, असे प्रसाद लाड यांनी म्हटले. अमित शहा हे खासदार सुनील तटकरे यांच्याही घरी पोहोचले होते, तिथे त्यांनी भोजनाचा आस्वाद देखील घेतला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अमित शहा यांची गुप्त बैठक देखील झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील नव्हते.