Bharat Gogawale News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शहा यांनी सुनील तटकरे यांच्या घरी भोजन केले. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या या दाैऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहा यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. आता भरत गोगावले यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आले आहे.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे नाराज झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही नावांना स्थगिती दिली. अमित शहा हे रायगडला पोहोचल्यानंतर थेट सुनील तटकरे यांच्या घरी गेल्याने विविध चर्चांना उधाण आले. सुनील तटकरे हे मुलगी आदिती तटकरे हिच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. भरत गोगावले यांना तटकरे यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण असताना देखील ते अनुपस्थित काल होते.Sanjay Raut : ‘शिवाजी, शिवाजी…एकेरी उल्लेख करत शाहांकडून महाराजांचा अपमान, गुन्हा दाखल करा’; संजय राऊत आक्रमक
अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आत बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित नव्हते. त्यामध्ये आता भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांचा फोन आलाय. भरत गोगावले यांना मुंबईला येण्याचे आदेश शिंदेंनी दिली आहेत. एक कार्यक्रम अर्धवट सोडूनच भरत गोगावले हे थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले हे आग्रही आहेत.
याबद्दल बोलताना भरत गोगावले हे म्हणाले की, पक्षाच्या कामासाठी शिंदेंनी बोलावले आहे. पक्षाच्या काही गोष्टी असतात, शेवटी पक्षबांधणी आणि पक्ष वाढवणे महत्वाचे आहे आणि जी काही जबाबदारी आमच्यावर दिली आहे ती आम्हाला पार पाडायची आहे. भरत गोगावले हे आता मुंबईकडे रवाना झाले आहेत. आता रायगडच्या पालकमंत्रिपदावरून घडामोडींना वेग आल्याचे दिसतंय. मात्र, यावर बोलणे गोगावले यांनी टाळल्याचे बघायला मिळाले. दादा भुसे देखील पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत.