• Fri. Apr 25th, 2025 12:15:57 AM
    सुट्टीत गावी गेलेल्या मुंबईतील चिमुकल्यासोबत अनर्थ घडला; कुटुंबावर दु:खाचा डोंगर, गावात हळहळलं

    Jogeshwari Boy Drowned in Somganga River Dhamanse Ratnagiri : जोगेश्वरीतील एका चिमुकल्याचा गावी रत्नागिरीत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चिमुकल्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

    Lipi

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : सध्या शाळांच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत. तर काही मुलांच्या परीक्षा झाल्या असून सुट्टीसाठी मुलं गावी आली आहेत. अशातच मुंबईहून रत्नागिरीतील आपल्या गावी आलेल्या एका चिमुकल्यासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबईहून आपल्या नातेवाईकांबरोबर गावी आलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला आहे.

    मुंबईहून गावी गेलेल्या चिमुकल्याचा मृत्यू

    ही घटना रत्नागिरीजवळ घडली आहे. धामणसे येथील सोमगंगा नदीच्या डोहात बुडून सहा वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. देवांश श्रवण मोरे (वय ६, रा. जोगेश्वरी, मुंबई) असं मृत्यू झालेल्या लहान मुलाचं नाव आहे.
    Kalyan News : रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं, डॉक्टरांना खिशात चिठ्ठी सापडली; दोन मुलांची माफी मागत लिहिलं कारण
    देवांश हा मुंबईहून ९ एप्रिल रोजी कोकणात गावी सत्यनारायणाची पूजा आणि पालखीसाठी आला होता. मुंबईहून गावी येऊन देवांश मजेत खेळण्याचा आनंद घेत होता. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. शुक्रवारी ११ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास तो नातेवाईक आणि वाडीतील इतर मुलांसोबत धामणसे जोशी वाडी येथील सोमगंगा नदीवरील डोह येथे आंघोळीसाठी गेला होता. याच दरम्यान देवांश पाण्यात बुडाला.
    Chhatrapati Sambhajinagar News : देवीच्या यात्रेला चौघे गेले, परत येताना अनर्थ घडला; दोन जीवलग मित्रांचा वाटेत अंत, सारं गाव हळहळलं

    रुग्णालयात चिमुकल्याचा मृत्यू

    त्याला तात्काळ बाहेर काढण्यात आलं. देवांशला अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी लगेचच जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं होतं. डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला हलवण्यात आलं. मात्र याच दरम्यान निष्ठुर नियतीने डाव साधला. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तपासणी करुन देवांशला मृत घोषित केलं. सायंकाळी ४.३० वाजता देशांचा त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून घोषित करण्यात आलं. या मन हेलावून टाकणार्‍या घटनेने कुटुंबावर आणि नातेवाईकांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

    Ratnagiri News : सुट्टीत गावी गेला, मुंबईतील चिमुकल्यासोबत रत्नागिरीत अनर्थ घडला; कुटुंबावर दु:खाचा डोंगर, अख्खं गाव हळहळलं

    या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएसएस) १९४ नुसार आकस्मिक मृत्यू क्रमांक २६/२०२५ म्हणून करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेने धामणसे परिसरात शोककळा पसरली असून पुढील तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed