• Wed. Apr 23rd, 2025 9:52:38 AM

    ‘शिवाजी, शिवाजी…एकेरी उल्लेख करत शाहांकडून महाराजांचा अपमान, गुन्हा दाखल करा’; संजय राऊत आक्रमक

    ‘शिवाजी, शिवाजी…एकेरी उल्लेख करत शाहांकडून महाराजांचा अपमान, गुन्हा दाखल करा’; संजय राऊत आक्रमक

    Sanjay Raut on Amit Shah : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचे गृहमंत्री अमित शहा रायगडावर येऊन गेले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेसह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. अमित शहांच्या भाषणाचा धागा पकडत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शहांवर निशाणा साधला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : आम्ही ज्याला औरंगजेबाचं थडगं म्हणतो त्याचा उल्लेख देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीसमोर औरंगजेबाची थडग्याला समाधीचा दर्जा दिला. रायगडावरून देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपतींच्या साक्षीने समाधीचा दर्जा दिला. Sanjay Raut on Amit Shah औरंगजेबाचा गुजरातमध्ये जन्म झाला त्यामुळे त्याच्याविषयी इतके प्रेम आहे का? हिंदुत्त्वाच्या शत्रूला त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्याचं वक्तव्य प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांनी तोंडून आलं. छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते त्यांना या गोष्टीचा त्रास व्हायला हवा होता. शिवरायांचे ढोंगी चाहते एसंशिं, देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis किंवा अजित पवार Ajit Pawar असतील त्यांनाही आक्षेप घ्यावासा वाटला नाही. जर समाधी हा शब्द इतर कोणाच्या तोंडून निघाला असता तर त्रिकुट होतं त्यातील दादा संयमी आहेत पण दोघे फडणवीस आणि शिंदेंनी थयथयाट केला असता. पण काल चकार शब्द निघाला नसल्याचं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री शिंदेंवर Eknath Shinde निशाणा साधला.

    अमित शहा यांचं भाषण ऐका, शिवाजी महाराज उल्लेख केलेला नाही. शिवाजी, शिवाजी, शिवाजी एकेरी उल्लेख, एरवी शिवाजी महाराज नाही म्हणालं तर याद राखा ते छत्रपती होते, ते छत्रपती होतेच, ते छत्रपती आहेत की नाही हे देशाच्या गृहमत्र्यांना माहित नाही. ते रायगडावरून येईन महाराष्ट्राल ज्ञान देतात. आमच्या महाराष्ट्राचे ज्ञानदेव आहेत. शिवाजी, शिवाजी, शिवाजीने ये किया, शिवाजीने ओ किया ही भाषा आहे तुमची, महाराजांना आरे-तुरे करायला तुमची जीभ धजावते कशी? हा महाराजांना अपमान आहे. मुख्यमंत्र्यांनी एकेरी उल्लेख केल्याबद्दल गुन्हा दाखल केला पाहिजे. इतरांवर करता मग देशाच्या गृहमंत्र्यांना, गुजरातच्या नेत्यांना अभय आहे का? कुठे आहेत एसंशिं नकली हिंदुत्त्ववाले? ही मुभा सगळ्यांना आहे का, भीतरट लोकं आहेत हे, यांचं छत्रपती प्रेम हे ढोंगी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    ज्यांनी छत्रपतींच्या महाराष्ट्रावरती औरंगजेबाप्रमाणे सूडाने कारवाया केल्या ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि छत्रपतींचा जय करणारे लोक माना डोलावणार या राज्यावरती इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही, एवढंच सांगतो. गेले तीन महिने औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या विचाराने भारावून गेले होते, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छावा चित्रपटाचं प्रदर्शन केलं त्यातून लोकं पेटल्याचं राऊत म्हणाले.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed