Beed News : आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपालिकेचे लेखापाल गणेश पगारे यांना कार्यकर्त्याच्या फोनवरून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पगारे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केलीये. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे. बीडमधील हाणामारीचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली.
आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा नवा कारनामा पुढे आलाय. बीड नगरपालिकेचे लेखापाल गणेश पगारे यांना कार्यकर्त्याच्या फोनवरून शिवीगाळ केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. पगारे यांनी आरोप केलाय. गणेश पगारे हे सकाळी घरी असताना चौरे नामक कार्यकर्ता त्यांच्याकडे आला आणि त्याठिकाणी चौरे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना फोन लावून दिला.पतीने पत्निच्या प्रियकराला मारली घट्ट मिठी, दोघांचा मृत्यू, पत्नीचा प्लॅन फसला, सोलापुरातील धक्कादायक घटना
कार्यकर्त्यांना घरी पाठवून केला बीड नगरपालिकेच्या लेखापालला शिवीगाळ
यावेळी एका कामाच्या संदर्भात विचारणा करत संदीप क्षीरसागर यांनी गणेश पगारे यांना शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलिस अधीक्षकांकडे लेखी अर्ज करण्यात आला असून आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे देखील गणेश पगारे यांनी म्हटले आहे. लेखापाल गणेश पगारे यांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाल्याचेही बघायला मिळतंय.
लेखापालांच्या घरचे सीसीटीव्ही पुढे
लेखापालांच्या घरी संदीप क्षीरसागर यांचे दोन कार्यकर्त्ये केले. यावेळी चौरे नामक कार्यकर्त्याचाच फोनवरून आमदार क्षीरसागर यांनी शिवीगाळ केला. आता याप्रकरणात संदीप क्षीरसागर यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोन व्यक्ती गणेश पगारे यांच्या घरी जाताना स्पष्ट दिसत आहेत. आता या संपूर्ण प्रकारावर आमदार संदीप क्षीरसागर नेमके काय भाष्य करतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.