Beed News : बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बीड नगरपालिकेच्या लेखापालांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप करत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. संदीप क्षीरसागर यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांनी देखील त्यांच्यावर गंभीर आरोप केले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.
योगेश क्षीरसागर यांचे संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप
लेखापाल गणेश पगारे यांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिवीगाळ केल्यानंतर कर्मचारी हे क्षीरसागरांच्या विरोधात एकवटले आहेत. आता क्षीरसागर यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांचे भाऊ डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनीही विरोधात भूमिका घेतलीये. हेच नाही तर त्यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोपही केलाय. यामुळे आता परत एकदा बीडचे राजकारण हे चांगलेच तापताना दिसतंय.संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपालिकेच्या लेखापालला शिवीगाळ केल्याचा आरोप, सीसीटीव्हीचा पुरावा असल्याचा दावालेखापालांनी केली पोलिस अधीक्षकांकडे थेट तक्रार
आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून जाचक स्वरूपात ब्लॅकमेलिंग केली जात आहे. त्याचाच आजचा हा एक भाग असल्याचे योगेश क्षीरसागर यांनी म्हटले. योगेश क्षीरसागर यांनी पुढे म्हटले की, संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मी तक्रार करणार आहे आणि या प्रकरणाचा पाठपुरावा देखील करणार आहे. यामुळे संदीप क्षीरसागर यांच्या अडचणीत वाढ होताना आता दिसतंय.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडे योगेश क्षीरसागर करणार तक्रार
एवढंच नाही तर इथल्या रजिस्ट्री ऑफिस, तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद याठिकाणी ब्लॅकमेलिंग केली आहे. याबाबतची तक्रार मी अजित पवार यांच्याकडे करणार आहे. यावेळी योगेश क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात तक्रारीचा पाढाच वाचला. योगेश क्षीरसागर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत. काही दिवसांपूर्वीच संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.