• Wed. Apr 23rd, 2025 4:13:26 PM
    Mumbai Metro: मिठी नदीखालून मेट्रो धारावीत; दोन स्थानकांची छायाचित्रे ‘एमएमआरसी ‘कडून प्रसिद्ध

    Mumbai Metro Line 3: नदीखालून जवळपास २२ मीटर खोलीवर भुयारीकरण करीत मार्गिका धारावीत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन स्थानकांची छायाचित्रे ‘एमएमआरसी’ने ‘एक्स’वर प्रसिद्ध केली आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स
    metro 3 new

    मुंबई : मिठी नदीखालून मार्ग काढीत भूमिगत मेट्रो ३ ही धारावीत पोहोचली आहे. लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर असलेल्या मार्गिकेच्या या टप्प्यातील दोन स्थानकांची छायाचित्रे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसी) प्रसिद्ध केली आहेत.

    मेट्रो ३ भूमिगत मार्गिका सध्या आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यान (बीकेसी) सुरू आहे. या मार्गिकेचा टप्पा २ अ धारावी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) असा असेल. त्यासाठी ही मार्गिका बीकेसी ते धारावीदरम्यान मिठी नदीखालून जाणार आहे. नदीखालून जवळपास २२ मीटर खोलीवर भुयारीकरण करीत मार्गिका धारावीत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर धारावी व शितलादेवी या स्थानकांची छायाचित्रे ‘एमएमआरसी’ने ‘एक्स’वर प्रसिद्ध केली आहेत.
    सुरेश वाडकरांवर नियमभंगाचा ठपका; जिल्हाधिकाऱ्यांचा शासकीय भूखंड वापराबाबत निष्कर्ष, नेमकं प्रकरण काय?
    शेजारून आणि वरून वाहणारी मिठी नदी, भूसंपादनातील अडथळे, वाहतूक वळविणे, दाटीवाटीचा भाग, विविध प्रकारच्या बांधकामांचा पाया अशा सर्व आव्हानात्मक स्थितीत ‘धारावी’ स्थानक बांधण्यात आले, असे याबाबात ‘एमएमआरसी’ने म्हटले आहे. जुन्या इमारतींच्या गुंतागुंतीचा पाया, मोठ्या भूमिगत जलवाहिन्या या स्थितीत अभियांत्रिकी व क्षमता यांचे मिश्रण म्हणजे ‘शितलादेवी’ स्थानक असल्याचे एमएमआरसीने म्हटले आहे.
    Shivshahi Bus: ‘शिवशाही’बाबत प्रवाशांत तीव्र नाराजी; बंद एसी, मळके पडदे, फाटक्या आसनांमुळे होतेय गैरसोय
    स्थानकांची नावे मराठीतच …
    या मेट्रोच्या स्थानकांची नावे इंग्रजीत असल्याचा आरोप होता. त्यावर ‘एमएमआरसी’ ने स्पष्टीकरण देत, स्थानकांचे फलक इंग्रजी व मराठीत असल्याचे नमूद केले आहे. नावे मराठीत नाहीत, हा आरोप तथ्यहिन असल्याचे ‘एमएमआरसी’ने म्हटले आहे. टप्पा २ अ मधील सहा स्थानकांवर फलक लावण्याची कामे सुरू झाली ‘एमएमआरसी’ने कंपनीने म्हटले आहे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed