• Sun. Jun 7th, 2026
    गायत्रीचा नाद सोड रे बाबा, माऊलीची विनवणी, लेक जुमानेना; प्रेयसीच्या मदतीने आईला संपवलं

    Solapur Son kills Mother : संशयित आरोपी रमेश कळसकोंडा याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. याची कुणकुण भीमाबाई यांना लागल्यानंतर त्यांनी रमेशच्या प्रेम प्रकरणाला विरोध केला

    Lipi

    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने आपल्या आईची निर्घृण हत्या केली. आरोपीने शेतातच आईचा साडीने गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या प्रेयसीविरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास अक्कलकोट पोलीस करत आहेत.

    भीमाबाई हणमंत कळसगोंड (वय 48, रा सिनुर, ता. अक्कलकोट) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मुलगा रमेश हणमंत कळसगोंड आणि त्याची प्रेयसी गायत्री गुरप्पा जेवरगी दोघे (रा. सिनुर ता. अक्कलकोट) यांच्या विरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

    रमेशचे गावातील महिलेसोबत अनैतिक संबंध

    संशयित आरोपी रमेश कळसकोंडा याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. याची कुणकुण भीमाबाई यांना लागल्यानंतर त्यांनी रमेशच्या प्रेम प्रकरणाला विरोध केला. बाईचा नाद सोड असा तगादा लावला होता. संबंधित महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवू नयेत, असा सल्ला आईनं दिलं. पण मुलगा काही केल्या ऐकायला तयार नव्हता.
    Uttar Pradesh Crime : बॉडी बनवता-बनवता नवऱ्याने पुरुषत्व गमावलं, सासू म्हणते दिराकडून मूल घे; माजी मुख्यमंत्र्यांच्या भाचीचा आरोप

    आईचा काटा काढण्यासाठी प्रेयसीची मदत

    रमेश आणि भीमाबाई यांच्यात सासत्याने वाद होत होते. संशयित आरोपी रमेश याने आईची हत्या करण्याचा कट रचला. रमेशने आईचा खून करण्यासाठी गावातील प्रेयसीची मदत घेतली. तिच्याशी संगनमत करत आरोपी रमेश याने शेतात जन्मदात्या आईचा साडीने गळा आवळला. उतारवयात असलेल्या आईवर अशाप्रकारे मुलानेच हल्ला केल्याने ती स्वत:चा बचाव करू शकली नाही. आरोपीनं साडीने गळा आवळल्याने गुदमरून तिचा जागीच मृत्यू झाला.
    Nashik Old Couple Death : सीमाने लताची मनापासून सेवा केली, तिला ५० हजार ठेवलेत; निवृत्त मुख्याध्यापकाची रडवणारी शेवटची चिठ्ठी

    मृत भीमाबाईंच्या पतीची फिर्याद

    मृत भीमाबाई यांचे पती हणमंत भागप्पा कळसगोंड (वय ५४) यांनी मुला विरोधात फिर्याद दिली. रमेश व गायत्री या दोघांचे प्रेम संबंध होते. भीमबाईचा विरोध होता. गुरुवारी साडेअकराच्या सुमारास संगप्पा गणपती उजनी यांच्या शेतात भीमबाई या हिचा रमेश आणि गायत्री या दोघांनी तिच्याच अंगावरील साडीच्या पदराने गळा आवळून खून केला. पोलिसांनी दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले आहे. तपास एपीआय सुरवसे करत आहेत. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक महेश स्वामी व एपीआय साईनाथ सुरवसे यांनी भेट दिली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed