• Thu. Apr 24th, 2025 6:47:50 AM
    Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर दोन दिवस मेगाब्लॉक; ३३४ लोकल फेऱ्या रद्द,  वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा!

    Western Railway Mega Block: शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवार मध्यरात्री साडेनऊ तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील ३३४ लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स
    western railway block

    मुंबई : भारतीय रेल्वेवरील शेवटचा ‘स्क्रू पायलिंगवर’ उभारलेला वांद्रे ते माहीमदरम्यान मिठी नदीवरील पुलाच्या मजबुतीकरणाचे अखेरचे काम आज, शुक्रवार, रात्रीनंतर सुरू होणार आहे. या कामासाठी शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवार मध्यरात्री साडेनऊ तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील ३३४ लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी ११० विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने केले आहे.

    ब्लॉक वेळेत २० अप-डाउन मेल-एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे. यामुळे काही मेल-एक्स्प्रेस अंशत: रद्द राहणार असून, काही मेल-एक्स्प्रेस सुमारे एक तास विलंबाने धावणार आहेत. अप-डाउन धीम्या मार्गावर शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० पर्यंत आणि अप-डाउन जलद मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १२.३० ते शनिवारी पहाटे ६.३० पर्यंत ब्लॉक असणार आहे. शनिवारी अप-डाउन धीम्या मार्गावर मध्यरात्री ११.३० ते शनिवारी ९ पर्यंत आणि अप जलद मार्गावर शुक्रवारी ११.३० ते शनिवारी सकाळी ८ पर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी बेस्टकडून अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार आहे.
    पत्नी कोमात, दोन्ही उच्चशिक्षित मुलं मुंबईत; नैराश्यातून निवृत्त मुख्याध्यापकाचा धक्कादायक निर्णय, घटनेनं खळबळ
    ब्लॉक पहिला
    स्थानक – माहीम ते वांद्रे
    मार्ग – अप-डाउन धीमा आणि अप – डाउन जलद

    वेळ – शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० आणि शुक्रवारी मध्यरात्री १२.३० ते शनिवार पहाटे ६.३०
    परिणाम – शुक्रवारी चर्चगेटहून रात्री १०.२३ नंतर वाजता सुटणाऱ्या सर्व धीम्या लोकल मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझदरम्यान जलद मार्गावर धावतील. विरार, भाईंदर आणि बोरिवलीवरून सुटणाऱ्या सर्व धीम्या लोकल सांताक्रूझ, मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावर धावतील. चर्चगेट ते दादरदरम्यान जलद आणि गोरेगाव ते वांद्रे दरम्यान अतिरिक्त लोकल चालवण्यात येतील. शनिवारी सकाळी विरारवरून अंधेरीपर्यंतच लोकल धावतील.
    आयसीयूचा अभाव बेतला जिवावर; चेंबूरमधील रुग्णाचा मृत्यू, ‘शताब्दी’त उपचार न मिळाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
    ‘बेस्ट’कडून जादा गाड्या

    प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्टकडून जादा बस सोडण्यात येणार आहेत, त्यामुळे शुक्रवारी तसेच शनिवारच्या रात्री साडे दहा वाजल्यापासून खोदादाद सर्कल ते अंधेरी पश्चिम स्थानक दरम्यान, सांताक्रुझ आगार ते दादर दरम्यान एकूण सहा जादा बस सोडण्यात येणार आहेत. शनिवारी आणि रविवारी सकाळी ६ ते सकाळी नऊ या दरम्यानही १८ जादा बस सोडण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

    आज शेवटची लोकल
    ■ रात्री १०.२३ चर्चगेट-भाईंदर
    ■ रात्री ११.४० चर्चगेट-विरार
    ■ रात्री १०.१२ बोरिवली-चर्चगेट
    ■ रात्री १२.०५ विरार-चर्चगेट
    मध्य प्रदेशात ‘पाणी… एक प्रेमकथा’! पाणीटंचाईने त्रस्त पत्नी माहेरी; पतीच्या पाठपुराव्यानंतर प्रशासन हलले
    उद्याची पहिली लोकल
    ■ पहाटे ५.४७ विरार ते चर्चगेट
    ■ सकाळी ८.०३ बोरिवली ते चर्चगेट
    ■ पहाटे ६.१५ चर्चगेट ते विरार
    ■ सकाळी ८.०३ चर्चगेट ते बोरिवली

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed