Solapur Eve Teasing With School Girl Students: सोलापुरात एका वृद्ध नराधमाने तीन विद्यार्थिनींना पाहून अश्लील चाळे करत त्यांचा विनयभंग केला. याप्ररकणी पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.
पैशांचं आमिष दाखवून घृणास्पद कृत्य करत केला विनयभंग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता यल्लप्पा कुंचिकोरवे याने घराच्या समोर असलेल्या शाळेतील तीन १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलींना बोलावून घेतले. जवळ घेऊन पैशांचे आमिष दाखवले. त्यांना त्याने घरी येण्यास सांगितले. शिवाय मुली शाळेवरून घरी जात असताना, तो रस्त्यावरील घराशेजारी असलेल्या बोळात थांबला. मुली रस्त्यावरून घरी जात असताना, त्यांना पाहून अश्लील चाळे करीत मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. हा घृणास्पद प्रकार शहरात घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
Raigad News: दोन वर्षांच्या चिमुरड्या नातवासह आजीची इमारतीवरुन उडी, रायगड हादरलं, कारण काय?
घाबरलेल्या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिकेला सांगितलं
वृद्ध नराधमाचे घृणास्पद कृत्य पाहून मुली घाबरल्या होत्या. पीडित विद्यार्थिनींनी ताबडतोब मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. मुख्याध्यापिकेने मुलींच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून हा प्रकार सांगितला. मुख्याध्यापिका व पालकांनी जेलरोड पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला, पोलिसांनी तात्काळ मुख्याध्यापिकेची फिर्याद घेतली आणि नराधम यलप्पा कुंचीकोरवे याला अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७९ व पोक्सो १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

