सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागाने कारवाई केल्यानंतर त्याच्या घरात प्राण्यांचे मांस…व शिकारीचे साहित्य सापडल्या प्रकरणी विभागाने काही दिवसांपूर्वी खोक्या भोसलेला ताब्यात घेतले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप सतीश भोसलेच्या वकिलांनी केला होता.वन विभागाने कारवाई केल्यानंतर खोक्याचे पूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.याच संदर्भात आज सतिश भोसले उर्फ खोक्या भोसलेची बायको तेजू भोसले आणि त्यांच्या…नातेवाईकांनी उपमुख्यमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले म्हणाल्या, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत. धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले, हे आम्ही दादांना सांगितले. आमच्या घरी जे शिकारीचे सामान सापडेल ते वनाधिकाऱ्यांनी आमच्या घरात ठेवले. आमच्या घरी CCTV देखील होते, ते तपासा, पण पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केलाय.