Thane Fraud: जनरल नर्सिंग मिडवायफरी कोर्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून फी घेऊन नंतर विद्यार्थ्यांना कोणतेही प्रमाणपत्र आणि निकाल न देता अचानक इन्स्टिट्यूट बंद केले.
या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात संबंधित इन्स्टिट्यूटच्या संस्थापकासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गंभीर बाब म्हणजे, या विद्याथ्यर्थ्यांची मूळ कागदपत्रेही इन्स्टिट्यूटने स्वतःकडे ठेवल्याने त्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबईतील मालाडमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्यांने २०२१च्या जूनमध्ये ठाण्यातील या इन्स्टिट्यूटमध्ये जनरल नर्सिंग मिडवायफरी कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. तीन वर्षांचा हा कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल, असे त्याला इन्स्टिट्यूटतर्फे आश्वासन देण्यात आले होते. त्याने या कोर्ससाठी १ लाख ६० हजार रुपये मोजले. संबंधित इन्स्टिट्यूटने त्याचे दहावी आणि बारावीची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला जमा करुन घेतला होता. त्याने हा संपूर्ण कोर्स पूर्ण केला. त्याची गेल्या वर्षी मे महिन्यात परिक्षा घेण्यात आली. ‘ती’ कृती शोभणारी नाही; दीनानाथ रुग्णालय प्रकरणावरुन मेधा कुलकर्णींचा भाजपला घरचा आहेर
डिसेंबरपर्यंत गुणपत्रिका आणि नंतर प्रमाणपत्र मिळेल, असे इन्स्टिट्यूटने सांगितले. डिसेंबर महिना उजाडल्यानंतर या विद्याथ्यर्थ्यांने निकालाबरोबर प्रमाणपत्राची मागणी केल्यानंतर त्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असे इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले. नंतर त्याच्याकडून इन्स्टिट्यूटने महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या नोंदणीसाठी आणखी २० हजार रुपये घेतले. तो सातत्याने गुणपत्रिका आणि प्रमाणपत्राची मागणी करत होता. त्यावेळी इन्स्टिट्यूटने वारंवार पुढची तारीख सांगून निकाल देण्यास टाळाटाळ केल्याचे या विद्याथ्यांच्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे, संबधित इन्स्टिट्यूटमध्ये इतरही अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यांनाही इन्स्टिट्यूटकडून निकाल आणि प्रमाणपत्र मिळालेले नसून अशाप्रकारे एकूण २२ विद्यार्थी, विद्यार्थीनीनी कोर्सच्या प्रवेशासाठी ३३ लाख १७ हजार ८५० रुपये भरले आहेत. २२ पैकी चार विद्यार्थी आणि १८ विद्यार्थीनी असून त्यातील कोणी कोर्ससाठी २ लाख ३२ हजार, १ लाख ८० हजार, दीड लाख अशा वेगवेगळ्या रकमा मोजल्या आहेत. भारतीय नौदल बनले देवदूत; ओमानच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी मच्छिमाराचे वाचवले प्राण; नेमकं काय घडलेलं?
गंभीर बाब म्हणजे, संबधित इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना कोर्स हा सरकारमान्य आहे की नाही किंवा तो कोर्स अधिकृत आहे का, याविषयी माहिती दिली नसल्याचा आरोप तक्रारीमधून करण्यात आला आहे. विद्यार्थी या इन्स्टिट्यूमध्ये गेल्यानंतर इन्स्टिट्यूट बंद असल्याचे आढळून आले. इन्स्टिट्यूटच्या संस्थापकाला विद्याथ्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोन बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच एका विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर इन्स्टिट्यूटचा संस्थापक, मालक आणि इतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध रविवारी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.Uddhav Thackeray: वक्फ विधेयकाविरुद्ध कोर्टात जाणार नाही; उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका
नामांकित क्लासकडूनही फसवणूक तीन महिन्यापूर्वी ठाण्यात एक फसवणुकीचा प्रकार समोर आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांकडून फी घेतल्यानंतर मध्येच क्लास बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे क्लासमधील शिक्षण थांबले. शिवाय, भरलेली फी वाया गेली. या प्रकरणी नामांकित इंजिनिअरींग क्लासच्या मुख्य संचालकासह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या क्लासने सुमारे ८० हून अधिक जणांना आकारलेल्या फीचा आकडा तब्बल तीन कोटीपेक्षा जास्त होता.