Train Cancellation Update : मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या की पालकांचा पर्यटनाकडे कल असतो. यातच उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांना गर्दी दिसून येते. हे दरवर्षीचे चित्र आहे. परंतु या ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध तांत्रिक कामांमुळे रेल्वे गाड्या रद्द केल्या जात आहे.
कोणत्या रेल्वे रद्द?
१२१४५ लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्स्प्रेस १३ एप्रिल रोजी रद्द केली आहे. १२१४६ पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस १५ एप्रिलला, तर जळगावमार्गे धावणारी १२९९३ गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस १८ एप्रिलला रद्द असणार आहे आणि १२९९४ पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस ही २१ एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे.
उधना-मालदा टाऊन दरम्यान नवीन एक्स्प्रेस
दरम्यान, पश्चिम रेल्वेने उधना-मालदा टाऊन दरम्यान दोन रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही रेल्वेंचे वेळापत्रक जाहीर केले असून ही रेल्वे भुसावळ मार्गे धावणार आहे. गाडी क्रमांक ०३४१८ उधना-मालदा टाऊन उन्हाळी विशेष रेल्वे १४ एप्रिलला धावणार आहे. तर गाडी क्रमांक ०३४१७ मालदा टाउन-उधना उन्हाळी विशेष रेल्वे ही १२ एप्रिलला धावणार आहे.
या स्थानकांवर थांबा?
या दोन्ही रेल्वेंना चालठाणा, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, उपाध्याय, बक्सर, आरा, पटना या स्थानकांवर थांबा असणार आहे.