Supriya Sule On Tanisha Bhise Death: पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भिसे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी तात्काळ संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“याप्रकरणाचा अहवाल आला आहे. त्यात दिसतंय की रुग्णालयाची चूक आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. २४ तासांच्या आत आम्हाला त्या डॉक्टर आणि त्या सगळ्या ज्या लोकांमुळे ही हत्या झाली आहे, त्यांच्यावर कारवाई झालेली पाहिजे. एका समितीचा अहवाल आला आहे. आता काय. दहा समित्यांच्या अहवालाची वाट बघणार का सरकार? वाट कुणाची बघताय, जीव गेला आहे कुणाचातरी, लेक आहे, बायको आहे, आई आहे, बहीण आहे. कधीतरी या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा”. Pune News: आठ वर्षांनी ‘गूड न्यूज’, पहिल्यांदा होणार होते आई-बाबा; रुग्णालयाचा हलगर्जीपणा अन् सुशांतची तनिषा गेली…
“त्या दोन मुली आता आयसीयूमध्ये आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. ते वडील आणि ते कुटुंब कुठल्या दु:खातून जातंय, हे सहन करणं अशक्य आहे. देव त्यांना या अडचणीच्या काळात ताकद देवो”. Pune Tanisha Bhise Case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी आमचा काहीही संबंध नाही, ‘त्या’ डॉक्टरांच्या आईचा धक्कादायक खुलासा
“ज्या पद्धतीने तिच्यावर अन्याय झाला तिची हत्या झाली, त्यांची लेक आम्ही आणू शकत नाही, पण त्यांना थोडासा आधार देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. या कुटुंबावर जो घात झाला आहे, त्या मुलीची हत्या झाली आहे, या महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर हा दिवस येऊ नये यासाठी मी इथे आले आहे. या हत्येसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला.