• Sat. Apr 12th, 2025 8:04:49 PM
    महाराष्ट्राचा विकास हाच संकल्प; भाजप स्थापनादिनी मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

    Devendra Fadnavis: महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेणे हाच पक्षाचा संकल्प आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.

    महाराष्ट्र टाइम्स
    fadnavis new1

    मुंबई : ‘आपला भाजप आज ४५ वर्षांचा झाला असून, सातत्याने तीन वेळा देशाचे पंतप्रधान होण्याचा बहुमान नरेंद्र मोदी यांना मिळाला. आज देशाच्या १६ राज्यांत भाजपचे सरकार आहे; तर २१ राज्यांत मित्रांसोबत आपला पक्ष सत्तेवर आहे. महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेणे हाच पक्षाचा संकल्प आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.

    भाजपच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यकर्ता संमेलनात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनसंघ ते भाजप या वाटचालीतील टप्प्यांचा आढावा घेतला. ‘देशाच्या सर्व भागांत प्रमुख राजकीय पक्ष म्हणून भाजप प्रस्थापित झाला आहे. मात्र, या वाटचालीत भाजपने लोकशाही सोडली नाही, घराणेशाही राबवली नाही. हा कार्यकर्त्यांचाच पक्ष राहिला. भाजपची वाटचाल तेजस्वी असून, राज्यातील जनतेला एक गतिशील, पारदर्शी, प्रामाणिक सरकार देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानी नेल्याखेरीज हे सरकार थांबणार नाही, ही ग्वाही मी देतो; पण या गतिमान वाटचालीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनता आणि सरकार यांमधील समन्वय व संवादाचा सेतू होऊन काम केले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला असाच प्रचंड विजय मिळवायचा आहे,’ असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
    Sanjay Raut: …त्यापूर्वीच फडणवीस होतील पायउतार; संजय राऊतांचं मोठं विधान, पुण्यातील घटनेवरुन केली टीका
    भाजपने घराणेशाही राबवली नाही याचा दाखला देताना फडणवीस यांनी लोकसभेत गृहमंत्री अमित शहा आणि अखिलेश यादव यांच्या संवादाचे उदाहरण दिले. ‘आमचा पक्ष कोणा परिवाराचा पक्ष नाही. तो मोठा असल्याने अध्यक्ष निवडीस योग्य वेळ लागणार, हे अमित शहा यांचे उत्तर भाजप व अन्य पक्षांतील नेमका फरक नोंदवणारे होते. महाराष्ट्रात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, लक्ष्मणराव मानकर, सूर्यभान वहाडणे आदी अनेक नेत्यांच्या परिश्रमातून व संघर्षातून आज आपण राज्यातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून सिद्ध झालो आहोत,’ असे ते म्हणाले.

    ‘उद्धव ठाकरे यांनी बेईमानी केल्यामुळे एकदा सत्ता गमावली; पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव सेनेचा त्याग करून सोबत आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून अभूतपूर्व यश संपादन केले,’ असे सांगतानाच, या भक्कम विजयानिशी कार्यकर्त्यांचे पाठबळ व मेहनतीमुळे राज्यातील सर्वांत मोठ्या, शक्तिशाली सरकारचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल फडणवीस यांनी नेतृत्वाबरोबरच कार्यकर्त्यांचेही आभार मानले.
    अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण! कोर्टाचा मोठा निकाल; PI कुरुंदकर दोषी, हत्या करुन मृतदेहाचे तुकडे खाडीत फेकलेले
    पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे सर्व मंत्री, पक्षाचे खासदार, आमदार उपस्थित होते.

    दरम्यान, नागपूरमध्ये महाल भागात पक्षाचा विदर्भ विभाग, नागपूर शहर आणि ग्रामीणच्या कार्यालयाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. सुमारे ३८ हजार चौरस फूट जागेवर कार्यालयाची नऊमजली इमारत उभी राहणार आहे.
    Screen Time: सततच्या ‘स्क्रीन टाइम ‘मुळे नैराश्याचा धोका; किशोरवयीन मुलींना सर्वाधिक धोका? सर्वेक्षण काय?
    जगाच्या पाठीवरील सर्वात मोठा पक्ष
    ‘राज्यात पक्षाचे दीड कोटी सदस्य नोंदवण्याचा संकल्प आपण वेगाने पूर्ण केला असून, या सदस्यांमुळे जगाच्या पाठीवरील सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजप स्थापित झाला आहे,’ अशा शब्दांत आनंद व्यक्त करून फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ‘ही सदस्यनोंदणी अत्यंत शास्त्रीय पद्धतीने केलेली असल्यामुळे प्रामाणिक व पारदर्शक ठरली आहे,’ असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed