• Mon. Apr 14th, 2025 9:51:11 AM
    Uddhav Thackeray: वक्फ विधेयकाविरुद्ध कोर्टात जाणार नाही; उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका

    Uddhav Thackeray: आम्ही आमची भूमिका मांडली आहे. यापुढे वेळ येईल, तेव्हा बोलता येईल, अशी भूमिका मांडत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधेयकाविरोधात न्यायालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

    महाराष्ट्र टाइम्स
    Uddhav Thackeray (3).

    मुंबई : ‘वक्फ संशोधन विधेयकाविरोधात काँग्रेसला न्यायालयात जायचे असेल, तर जाऊ द्या. आम्ही आमची भूमिका मांडली आहे. यापुढे वेळ येईल, तेव्हा बोलता येईल,’ अशी भूमिका मांडत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधेयकाविरोधात न्यायालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘भाजपला खिश्चन समाजाकडे असलेल्या जमिनी घ्यायच्या असून, नंतर हिंदू देवस्थानांच्या जमिनीवरही त्यांचा डोळा आहे,’ असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

    वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत संमत झाले. या विधेयकास शिवसेना उबाठा पक्षाने विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी भूमिका मांडली.
    अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण! कोर्टाचा मोठा निकाल; PI कुरुंदकर दोषी, हत्या करुन मृतदेहाचे तुकडे खाडीत फेकलेले
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’मधील एका लेखात, वक्फनंतर कॅथोलिक चर्च आणि संबंधित संस्थांकडे असणाऱ्या सात कोटी हेक्टर जमिनीकडे वेधले आहे. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘वक्फविषयी आम्ही आमची भूमिका मांडली आहे. या विधेयकाबाबत भाजपला हिंदूंशी काही घेणे-देणे नाही. त्यांचा छुपा अजेंडा ‘ऑर्गनायझर’ने उघड केला आहे. भाजप वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेऊन, त्यांचा मित्रांना देणार आहे. त्यानंतर पुढची पायरी म्हणून ख्रिश्चन समाजाकडे असणाऱ्या जमिनी घेणार आहे. हळूहळू बौद्ध, शीख, जैन धर्मीयांकडील जमिनी सरकार घेणार आहे. मग हिंदू देवस्थानांच्या जमिनीवरसुद्धा त्यांचा डोळा आहे.’
    Sanjay Raut: …त्यापूर्वीच फडणवीस होतील पायउतार; संजय राऊतांचं मोठं विधान, पुण्यातील घटनेवरुन केली टीका
    ‘भाजप या सर्व मोक्याच्या जमिनी घेऊन त्यांच्या मित्रांना देईल. भाजपचे हे प्रेम समाजाबद्दल नाही, तर त्यांच्या मित्रांवर आहे. धर्माधर्मांत भांडणे लावण्याचे काम भाजप करत आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
    एमएमआरडीएला अर्थलाभ; ‘बीकेसी’तील भूखंडाच्या भाडेतत्त्वातून ३८४० कोटी रुपयांचा हातभार
    रामाचे नाव घेण्याची यांची पात्रता नाही‘निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानंतर रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले. पण मते मिळाल्यावर आता लोकांची फसवणूक केली. यामुळे या लोकांची रामाचे नाव घेण्याची पात्रता नाही,’ असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed