Ajit Pawar on Sharad Pawar : “बारामतीत आत्तापर्यंत मी जेवढं काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. 1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी काय कामे केली ते पाहा, आणि मी केलेलं काम पाहा”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
बारामतीत दिव्यांगांना मोफत सायकल वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली. यावेळी अजित पवार बोलत होते. “बजेटमध्ये डीपीडीसीला 22000 कोटी दिले. त्यातला एक टक्का दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा तरतूद केली आहे. दिव्यांगाना सहानभूती नको तर समान संधी पाहिजे. दिव्यांगाना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला आहे”, असं अजित पवार म्हणाले.
‘तेवढं काम करणारा एकही आमदार मिळणार नाही’
“बारामतीत आत्तापर्यंत मी जेवढं काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. 1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी काय कामे केली ते पाहा, आणि मी केलेलं काम पाहा. मी अजूनही काम करणार”, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावला. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवार काय प्रत्युत्तर देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
“उन्हात कार्यक्रम आहे. सावलीत भाषण असतं तर बरं झालं असतं. उन्हात भाषण करायचं, बरं वाटत नाही. बीडीओंना म्हटलं होतं, सावलीत घ्यायचं ना. उन्हात तुम्ही तापत आहात. तो ताप माझ्यावर निघाला तर अवघड व्हायचं”, असंही अजित पवार म्हणाले.