• Sun. Apr 13th, 2025 5:48:19 PM

    Ajit Pawar यांनी स्वतःच्याच संचालकांचे काढले वाभाडे! दहा वर्षात केलेल्या गैरकारभाराची दिली उदाहरणे

    Ajit Pawar यांनी स्वतःच्याच संचालकांचे काढले वाभाडे! दहा वर्षात केलेल्या गैरकारभाराची दिली उदाहरणे

    Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांच्या गैरकारभाराचे उदाहरणे देत कारखान्याचे विरोधक पृथ्वीराज जाचक यांना पुढील अध्यक्ष म्हणून जाहीर केले. सध्या असलेल्या संचालकांना संधी दिली जाणार नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

    महाराष्ट्र टाइम्स

    दीपक पडकर, इंदापूर : इंदापूर तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः सभासद असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर असलेल्या संचालकांनी कशा पद्धतीने गैर कारभार केला, याची उदाहरणे खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी देत स्वतःच्याच नेतृत्वाखालील संचालकांचे वाभाडे सर्व सभासदांसमोर काढले. एवढेच नाही तर आत्ता सत्तेवर असलेल्या एकाही संचालकाला संधी मिळणार नाही, असे स्पष्ट करत कारखान्याचे विरोधक असलेले पृथ्वीराज जाचक हेच पुढील पाच वर्षे कारखान्याचे अध्यक्ष असतील, असे जाहीरही करून टाकले.

    छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक १० वर्षानंतर सोमवारी ७ तारखेपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर अचानक घडामोडी घडल्या आणि कारखान्यातील विरोधक असलेले शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष तथा कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासोबत शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकी घेतली. या बैठकीमध्ये पृथ्वीराज जाचक यांच्याकडे संपूर्ण पाच वर्ष कारखान्याची सूत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.

    यावेळी पृथ्वीराज जाचक यांनी रविवारी म्हणजे आज आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यास आपण स्वतः उपस्थित राहून हा निर्णय जाहीर करू असे अजित पवारांनी सांगितले. आणि त्यानंतर आज अजित पवार हे या मेळाव्यासाठी भवानीनगर येथे आपला नियोजित दौऱ्यातील इतर काही कार्यक्रम रद्द करून पोहोचले.

    यावेळी अजित पवार यांनी छत्रपती कारखान्याच्या समोर सध्या असलेल्या आर्थिक अडचणी मांडल्या. त्याचबरोबर त्यांनी सध्या सत्तेवर असलेल्या संचालकांनी नेमके कसा कारभार केला याची उदाहरणे दिली. यामध्ये काही संचालकांनी…. अशा पद्धतीने कामगारांना कामावर घेतले की त्यातून कारखान्याचे कसे वाटोळे झाले याचीही उदाहरणे दिली. खुद्द अजित पवारच आपल्या संचालकांच्या विषयी सांगत असल्याने उपस्थित सभासदांनी टाळ्या वाजवत त्यांना प्रतिसाद दिला. मात्र इंदापूर तालुक्यात याबाबत चांगलीच चर्चा सुरु आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed