नटराज नाट्यकला मंडळाच्या वतीने बारामतीमधील कलाशिक्षक चित्रकारांच्या चित्रकला कृतींचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध कला शिक्षकांनी आपली कला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर सादर केली.यावेळी एका चित्रकाराने उपमुख्यमंत्री अजित पवारांची हुबेहूब प्रतिमा अवघ्या काही क्षणात रेखाटली.ही प्रतिमा पाहून अजित पवार ही भारावून गेले व कला शिक्षकांचे कौतुक केले.