Pune News : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली. रागाच्या भरात वादानंतर तरुण तरुणीनी डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात उड्या घेतल्या, स्मार्तपणे बेपत्ता झाले. येथील शोधकार्य सुरु असून पाण्याचा वेग कमी केल्यानंतर अधिक पुरेसा शोध घेण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस आणि गावकरी तैनात आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास कविता पारधी, पप्पू खंडागळे आणि कविताची १३ वर्षांची मावस बहीण दिव्या राजाराम काळे हे तिघे दुचाकीवरून टाकेवाडी येथील ठाकर वाडीकडे निघाले होते. टाकेवाडीच्या डाव्या कालव्याजवळ आल्यानंतर कविता आणि पप्पू यांच्यात कुठल्यातरी कारणावरून भांडण झालं. रस्त्यावरच दोघांमध्ये वाद उफाळला. यातुनच रागाच्या भरात कविताने कालव्यातील पाण्यात उडी घेतली. तिला वाचवण्यासाठी पप्पूनेही पाण्यात उडी मारली.Pune News : थांब तुला उकळत्या पाण्यात टाकतो, १४ वर्षांच्या शेजाऱ्याची मस्ती, आराध्या खरंच हातून निसटली, पुण्यातील चिमुकली भाजलीदोघांनाही पोहता येत असल्याने ते बाहेर येतील, असं दिव्याला वाटलं होत, मात्र, बराच वेळ झाला तरी दोघेही दिसले नाहीत. घाबरलेली दिव्या जवळच राहणाऱ्या रामदास भिमाजी चिखले यांच्या शेडमध्ये अंधारात जाऊन बसली. सकाळी शेतकरी रामदास चिखले शेडमध्ये आले असता त्यांना दिव्या दिसली. तिला विचारपूस केल्यानंतर तिने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर रामदास यांनी गावातील लोकांना माहिती दिली. गावाचे पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उडी घेतलेल्या ठिकाणापासून सात ते आठ किलोमीटरपर्यंत कालव्याची पाहणी केली, पण दोघांचा ठावठिकाणा लागला नाही.
शोधकार्यात अडथळे
डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात सध्या ४०० क्युसेक्स वेगाने पाणी वाहत आहे. मोठ्या प्रवाहामुळे बेपत्ता दोघांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस. आर. मांडवे, संदीप कारभळ, पोलीस हवालदार संजय नाडेकर आणि पोलीस योगेश रोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गावाचे पोलीस पाटील उल्हास चिखले यांनी मंचर पोलिसांना माहिती कळवली. शोधकार्य वेगाने सुरू असले तरी पाण्याचा वेग कमी झाल्याशिवाय यश मिळणं कठीण असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
मंचर पोलिसांनी घोडेगाव तहसीलदारांना पत्र देऊन कालव्यातील पाणी कमी करण्याची विनंती केली आहे. तहसील विभागाने डिंभे धरण प्रशासनाला पाणी कमी करण्याची सूचना दिली असून, लवकरच पाण्याचा वेग कमी केला जाईल. त्यानंतर शोधकार्याला गती येणार आहे. मात्र, या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय.