Raj Thackeray: राज ठाकरेंनी मराठी भाषेचा आग्रह धरत आंदोलन छेडलं. गेल्या काही दिवसांत मनसैनिकांनी पुणे आणि ठाण्यातील बँकांमध्ये शिरुन तिथे मराठी पाट्या लावण्याचा आग्रह धरला. बँकांमधील अमराठी कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलावं असाही आग्रह धरला.
राज ठाकरेंनी मराठीचा राग आळवल्याचा फटका उद्धव ठाकरेंच्या पक्षाला बसत आलेला आहे. मराठा मतांचं दोन ठाकरेंच्या पक्षात विभाजन होत असल्याचा फायदा भाजपला होतो. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपसाठी प्रचार केला. पण आता राज यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपची अडचण झाली. बँकांमधील अमराठी कर्मचाऱ्यांविरोधात मनसे आक्रमक पवित्रा घेतल्यानं सत्ताधारी भाजपची गोची झाली.Karuna Munde: मला प्रेमात अडकवून लग्न करणाऱ्याला २० कोटींची ऑफर; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप, अश्रू अनावर
मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे सक्रिय झाले. मनसैनिकांची आंदोलन गाजत असताना राज यांनी त्यांना थांबण्याचे आदेश दिले. मनसेच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका भाजपला बसण्याची शक्यता होती. बँकांमध्ये देशाच्या विविध राज्यांमधील कर्मचारी काम करतात. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. त्यांची मातृभाषा मराठी नाही. त्यामुळे त्यांना अस्खलित मराठी बोलता येत नाही.
राज ठाकरेंनी मराठी भाषेचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतल्याचा फटका भाजपला बिहारमध्ये बसण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्त्व चिंतेत होतं. बँकांमध्ये बिहारी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात भाजपचं सरकार असताना मनसैनिकांनी बिहारी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या असत्या, तर याचे परिणाम भाजपला बिहारमध्ये भोगावे लागू शकले असते. बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे.Thane Politics: सेना, भाजपमध्ये वर्चस्वाची लढाई, पण फटका आव्हाडांना; शिंदेंच्या होम ग्राऊंडवरील संघर्ष विचित्र वळणावर
ऑक्टोबर-नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होईल. तिथे भाजप सध्या नितीश कुमारांच्या जेडीयूसोबत सत्तेत आहे. जेडीयूपेक्षा अधिक जागा जिंकून युतीत पुन्हा एकदा मोठा भाऊ राहण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं बिहार दौरे वाढत आहेत. महाराष्ट्रात मनसेच्या निशाण्यावर बिहारी आले असते, तर त्याचा फटका भाजपला बिहार विधानसभा निवडणुकीत बसला असता. पण राज यांनी मनसैनिकांना तूर्तास थांबवल्यानं बिहार भाजपचा जीव भांड्यात पडला आहे.