एका हॉटेलवर काम करत असलेल्या एका युवकाला तिघाजणांनी दुचाकी वर येऊन बेदम मारहाण केली. या घटनेत हा युवक जखमी झाला. पोलिसांनी तपास करत या तिघांना जेरबंद केले.
काल संध्याकाळी पाच वाजता सुमारास सागर टी पॉइंट सेंटर येथे काम करत बसलेल्या हेमंत रतिलाल भिसे या युवकाला अचानक तिघा जणांनी दुचाकी वर येऊन बेदम मारहाण केली कसलीही विचारणा न करता थेट मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांमध्ये पसरले आणि बारामती मध्ये वाढत चाललेल्या या गुंडगिरीवर लोकांनी प्रक्षोभ व्यक्त केला.
या घटनेची दखल पोलिसांनी ही तत्परतेने घेतली आणि त्यांनी पावले उचलली. दरम्यान ज्या युवकाला मारहाण करण्यात आली होती त्याला बारामतीतील भाग्यश्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याप्रकरणी युवकाचा भाऊ दीपक रतिलाल भिसे यांनी बारामती शहर पोलिसांकडे तक्रार दिली. तिघा जणांनी कोणतेही कारण नसताना अचानक मारहाण केल्यानंतर हेमंत याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्यांनी पोलिसांकडे स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे हलवली. दुचाकीवरून आलेले तिघेजण हे इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यानंतर पोलिसांनी आज त्यांना ताब्यात घेतले.
हेमंत हा बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या सागर टी पॉइंट येथे काम करत असताना अचानक तिघेजण दुचाकीवर आले आणि त्यांनी थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये हॉटेलमधील कुलूप तसेच पाण्याची बाटली व हॉटेलमधील भांडे याच्या साह्याने हेमंत त्याच्या डोक्यात गंभीर दुखापती करण्यात आली होती. या घटनेनंतर हेमंत याला बारामतीतील भाग्यजय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्याची गंभीर दखल बारामती शहर पोलिसांनी घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील आदेश हर्षवर्धन लोंढे, मयूर अंकुश गायकवाड, आदित्य विकास लोंढे या तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले.