Murder of Bulldozer Driver in Pune : पिंपरी चिंचवडच्या भोसरी भागात बुलडोझर चालक सिद्धाराम ढाले यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यांचे शरीराचे पाच तुकडे करण्यात आले आहेत. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सिद्धाराम यांचा मृतदेह मोशीच्या खडी मशिन खाणीत आज सापडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सिद्धाराम २९ मार्चला सकाळी कामासाठी घरातून बाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी शोध घेऊनही ते सापडले नाहीत. अखेर ३१ मार्चला त्यांच्या पत्नीने भोसरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. २ एप्रिलला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मोशीतील खाणीत स्थानिकांना सिद्धाराम यांचे धड आढळले. तिथे त्यांचा मोबाईलही सापडल्याने ओळख पटली. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांच्या शरीराचे तुकडे केले असून, चेहरा, डोके, डावा पाय आणि दोन्ही हात वेगळे केले आहेत.Pune News : थांब तुला उकळत्या पाण्यात टाकतो, १४ वर्षांच्या शेजाऱ्याची मस्ती, आराध्या खरंच हातून निसटली, पुण्यातील चिमुकली भाजली
या प्रकरणी सिद्धाराम यांच्या पत्नीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये देखील शीर धडा वेगळे करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता मोशी भागात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सिद्धाराम ढाले यांची हत्या नेमकी कुणी आणि का केली असावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हत्या करणाऱ्याच्या मनात सिद्धाराम याच्या मनात इतका द्वेष का होता? असा प्रश्न उपस्थित होतोय. या घटनेमागचं गूढ शोधणं हे पोलिसांपुढील मोठं आव्हान आहे. पोलिसांना त्यात यश येतं का? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.