Beed Teacher Ended Life : बीडमध्ये एक मोठी घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका माध्यमिक शिक्षकाने आपलं आयुष्य संपवलं आहे.
दरवाजा उघडून आत पाहिले तर…
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास उघडे हे शिरसदेवी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. सकाळी बराच वेळ झाला तरी त्यांच्या घरातून कोणतीही हालचाल होत नसल्याने शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना संशय आला. त्यांनी तातडीने उघडे यांच्या घराकडे धाव घेतली. घराचा दरवाजा उघडून आत पाहिले असता, समोरच कैलास उघडे यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून नातेवाईकांनी एकच टाहो फोडला.
Mira Bhayander Hospital : ICU मध्ये उंदराने हात कुरतडला, मीरा भाईंदरमध्ये महिलेचा करुण अंत; सरकारी हॉस्पिटलमधील प्रकाराने संताप
सुसाईड नोटमधील खळबळजनक खुलासा
पोलिसांना घटनास्थळी एक नोट सापडली आहे, ज्यामध्ये उघडे सरांनी गेल्या 5-6 दिवसांत त्यांच्यासोबत घडलेल्या घडामोडींचा पाढाच वाचला आहे. यामध्ये त्यांनी शाळेतील काही सहकारी शिक्षकांकडून होणाऱ्या त्रासाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. नोटमधील माहितीनुसार शाळेतील काही शिक्षकांनी त्यांना मानसिक त्रास दिला होता. पगाराशी संबंधित काही तांत्रिक अडचणी किंवा जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचे संकेत दिले आहेत. आजारी असल्यामुळे त्यांनी मेडिकल रजेचा अर्ज केला होता, त्यासंदर्भातही काही अडचणी निर्माण करण्यात आल्या होत्या. चिठ्ठीत काही विशिष्ट शिक्षकांची नावे सुद्धा नमूद करण्यात आली आहेत.
Pune Crime : जुन्या वादाचा राग घेऊन एकट्याला गाठलं, काही समजण्याच्या आत हल्ला; पुण्यात भरवस्तीत तरुणाला जागीच संपवलं
कुटुंबाचा संताप आणि मागणी
या घटनेनंतर कैलास उघडे यांच्या कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘आमच्या माणसाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं आहे’, असा थेट आरोप कुटुंबियांनी केला आहे. ‘जोपर्यंत सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या दोषी शिक्षकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही’, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, सुसाईड नोट जप्त केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शाळेतील कामकाज आणि संबंधित शिक्षकांकडे चौकशी होण्याची शक्यता आहे. एका गुणी शिक्षकाने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने शैक्षणिक वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे. याचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत.
