Indapur Accident News : टायर फुटल्याने नियंत्रण सुटलेली क्रूझर गाडी थेट दुसऱ्या लेनवर गेल्याने हा भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नेमका कसा झाला अपघात?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, MH 14 LB 1613 क्रमांकाची क्रूझर जीप पुण्याकडून सोलापूरकडे जात असताना अचानक टायर फुटला. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून जीप दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेने येणाऱ्या MH 12 YQ 6603 क्रमांकाच्या ट्रकवर आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की जीपचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Condom Price Surge : आखाती युद्धाचा छ. संभाजीनगरच्या कंडोम उत्पादनाला फटका, केमिकल महागल्याने किमती वाढण्याची चिन्हं
करूळ घाटात इथेनॉलचा टँकर पलटी
कोकण-कोल्हापूर जोडणाऱ्या कारूळ घाटात येथे इथेनॉल भरलेल्या टँकरचा मोठा अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून टँकरचालक थोडक्यात बचावला आहे. इथेनॉलने भरलेला टँकर करूळ घाटात पलटी झाला. या अपघातात केबिनमध्ये अडकलेल्या चालकास क्रेनच्या साहाय्याने वैभववाडी पोलिसांनी बाहेर काढले. त्याच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Beed Crime : ‘सहकाऱ्यांचा मानसिक त्रास, पगाराची जाणूनबुजून अडवणूक’; माध्यमिक शिक्षकाने आयुष्य संपवलं, घटनास्थळी चिठ्ठी सापडली
इथेनॉलने भरलेला टँकरचा MH 09 FL 7165 चालक नकाप्पा डोईफोडे घेऊन वारणा येथून गोव्याला जात होता. गगनबावडापासून काही अंतरावर करून घाटात चालकाचा ताबा सुटल्याने टँकर डोंगराकडील बाजूला गटारात पलटी झाला. या अपघातात टँकरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.
