• Tue. Jun 30th, 2026

    महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळेत होणार; नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 2, 2025
    महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळेत होणार; नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन – महासंवाद




    मुंबई, दि.२ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच गुरुवार दि. ३  एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी केले आहे.

    सर्वोच्च न्यायालयाने SLP No. ८५७६/२०२५ या याचिकेमध्ये विद्यमान निर्वाचन अधिकाऱ्यांऐवजी “अवर सचिव स्तराचे नवीन निर्वाचन अधिकारी” तात्काळ नियुक्त केल्यास निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू ठेवता येईल असे निर्देश २ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशान्वये दिले आहेत. या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणूक घेण्याकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे अवर सचिव सुनीलकुमार धोंडे यांची नियुक्ती निर्वाचन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे, असेही सचिव धीरज कुमार यांनी कळविले आहे.

    00000

    अर्चना देशमुख/विसंअ







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed