नागपूर : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली असली, तरी ते मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी सरकारमधील मंत्री वारंवार त्यांच्या भेटीला जातात आणि सरकारची भूमिका झुकलेली दिसते, असा आरोप करत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.
“जरांगे यांच्या आंदोलनात इतक्या वेळा मंत्री गेले आणि आता पुन्हा तेच बोलण्याची पाळी आली आहे. ते माना वाकवत जातात. त्यांची मान कशी तुटत नाही, मला समजत नाही. इतक्या खाली मान वाकते की एखाद्या पाळीव प्राण्यालाही लाजवेल अशा पद्धतीने मंत्र्यांची मान वाकत जाते, त्यामुळे जरांगे पाटलांना बादशहा झाल्यासारखं वाटते. सरकार झुकती है, झुकानेवाला चाहिये, त्यामुळे सरकार झुकते, त्यामुळे काय करायचे, हे सरकार आणि जरांगे बघतील,” असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
गणेशोत्सवाच्या काळात जरांगे पाटील मुंबईला गेल्यास मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने आंदोलन कसे हाताळायचे, हा त्यांचा प्रश्न असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. मात्र, सरकारने ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ओबीसी विरुद्ध हिंदू असा वाद निर्माण करण्याचे काम सरकारने केले आहे. ओबीसींवर आलेले संकट हे सरकारचे पाप आहे. ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. मोठ्या संख्येने असलेल्या लोकांना नोकऱ्यांमध्ये कमी जागांमध्ये सामावून घेतलं जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न गंभीर असल्याचे ते म्हणाले. काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा ओबीसींच्या हातातून गेल्याचा दावा करत त्यांनी बोगस प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर सरकारला घेरले. ओबीसीच्या नावावर प्रमाणपत्र घेऊन लोक निवडून येत असतील, तर ओबीसी सुरक्षित कुठे आहे? खोटे प्रमाणपत्र घेऊन निवडून येणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्याकडून ओबीसी नेत्यांवर करण्यात येणाऱ्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवरूनही वडेट्टीवार यांनी सरकारला लक्ष्य केले. सरकारमध्ये दम असेल तर त्यांनी कारवाई करून दाखवावी, असे आव्हान केले. आंदोलन करण्याला आमचा विरोध नाही, मात्र सरकारने कायदा सुव्यवस्था आणि सर्व समाजांच्या हिताचा विचार केला पाहिजे, असं ते म्हणाले.
दरम्यान, ओबीसींच्या प्रश्नांवर देशव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. काल दिल्लीत देशभरातील 63 संघटनांची बैठक झाली. काँग्रेसचे नेते त्या बैठकीत होते. ही वज्र मूठ बांधण्याचं काम सुरू झाला आहे. देशभर ओबीसींचं आंदोलन उभ करण्याचे काम सुरू होणार आहे. जात जनगणना करा ही आमची प्रमुख मागणी आहे. ज्यांची जेवढी संख्या असेल तेवढे त्यांच्या वाट्याला लोकसंख्येप्रमाणे येऊ द्या. एवढी सोपी मागणी राहुल गांधी यांच्या माध्यमातून आमची मागणी आहे. तोच धागा घेऊन आम्ही आंदोलन करणार असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा