मंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पवार आणि बारामतीपुढे झुकणार नाही असा हल्लाबोल गोरेंनी केला. राजकारण संपलं तरी चालेल, पण बारामती पुढे झुकणार नाही, असे ते म्हणाले. मतदारसंघातील आंधळी गटाच्या वतीने गोरेंचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. गोरेंवर झालेल्या आरोपांनंतर पहिल्यांदाच यावेळी ते जनतेसमोर आले होते.