• Tue. Apr 22nd, 2025 9:02:15 PM

    मुनगंटीवारांचं ‘दुखणं’ अधूनमधून बाहेर; शेलारांचं स्वागत केलं, पण पालकमंत्र्यांचा उल्लेख टाळला, कारण काय?

    मुनगंटीवारांचं ‘दुखणं’ अधूनमधून बाहेर; शेलारांचं स्वागत केलं, पण पालकमंत्र्यांचा उल्लेख टाळला, कारण काय?

    Chandrapur News : चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांनी आशिष शेलारांचं स्वागत केलं, पण पालकमंत्री अशोक उईके यांचा उल्लेख त्याच्या एका पोस्टमधून टाळला. याची सध्या चर्चा आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    निलेश झाडे, चंद्रपूर : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. ते विरोधी पक्ष नेत्यासारखे वागले. मंत्री मंडळातून डावल्याने मुनगंटीवार यांच्या मनावरील ताबा सुटल्याची चर्चा भाजपच्या गोट्यात रंगली होती. या चर्चेला आता पुन्हा पेव फुटले आहे. त्याला कारण ठरलं मुनगंटीवार यांची फेसबुकची पोस्ट. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचं स्वागत मुनगंटीवार यांनी केलं. यावेळी चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती होती. मात्र फेसबुक पोस्टमध्ये मुनगंटीवार यांनी उईके यांचं नाव टाळलं. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मुनगंटीवार अद्यापही मंत्रिमंडळातून डावल्याच्या दुःखातून बाहेर पडले नसल्याचं आता बोललं जात आहे.

    असं वागणं बरं नव्हे…

    चंद्रपूरातील कोरपणा येथील आदिवासी सांस्कृतिक महोत्सवासाठी राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचं चंद्रपूरातील शासकीय विश्रामगृहात आगमन झालं होतं. यावेळी मुनगंटीवार यांनी शेलारांना गणरायाची प्रतिकृती भेट दिली. त्यांचं स्वागत केलं. शेलार यांच्या सोबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार यांनी शेलारांच्या स्वागताचे फोटो फेसबुकवरून शेअर केले. काही ओळी लिहिल्यात मात्र त्यात पालकमंत्री उईकेंच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही. विकास पुरुषाची ही कृती अनेकांना रुचलेली नाही.
    Chandrapur News : दशकातील मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे, एप्रिल – मे महिन्यात रेकॉर्डतोड उष्णता

    हे दुःख दिसणार नाही असं काही तरी करा…

    खरंतर चंद्रपूर भाजप म्हटलं की सुधीर मुनगंटीवार हे समीकरण राज्याचा राजकारणाला ठाऊक आहे. मुनगंटीवार यांचं पक्षासाठी योगदानही मोठं आहे. त्यामुळेच की काय, मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या चर्चेत मुनगंटीवार यांचं नाव यायचं. मात्र, २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काहीसं चित्र बदललं. त्यांना मंत्री मंडळातून डावलण्यात आलं. त्यांचं दुखणं मोठं आहे. त्यात भाजपात आलेले आमदार किशोर जोरगेवार यांचा पक्षात प्रभाव वाढत आहे. जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला मुनगंटीवार यांनी विरोध केला होता. मात्र, पक्षाने जोरगेवार यांना उमेदवारी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाण्यात जोरगेवार यांना यश मिळालं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवे मुनगंटीवार दिसलेत. त्यांनी स्वपक्षातील धोरणावर आगपाखड केली.
    Beed News : ज्या झाडाखाली भावाने आयुष्य संपवलं, ठीक दोन वर्षांनी तिथेच दादा-वहिनीने आरोपीचा काटा काढला

    Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचं ‘दुखणं’ अधूनमधून बाहेर; शेलारांचं स्वागत केलं, पण पालकमंत्र्यांचा उल्लेख टाळला, कारण काय?

    मुनगंटीवार म्हणाले चंद्रपूरला डावलून चालणार नाही

    भाजपचे मुनगंटीवार यांच्या मनातील खदखद पुन्हा एकदा समोर आली. दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही. चंद्रपूर जिल्ह्याचा एक जोडला तरच या महाराष्ट्राचा दस नंबर विकास होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सर्वश्रूत आहे की मुनगंटीवाराना मंत्रिमंडळातून वगळल्याने ते नाराज आहेत. ही नाराजी या पूर्वी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केली. सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला गेला होता. त्यात राज्याचे आशिष शेलार उपस्थित होते. त्यांच्या समोरच मुनगंटीवारांनी मनातील सल बोलून दाखवली असावी, अशी चर्चा आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed