Kolhapur News : प्रशांत कोरटकर याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर कोरटकरच्या वकिलांनी कोर्टात कोरटकरसाठी कारागृहात स्वतंत्र आणि सुरक्षित कोठडीची मागणी केली. वकिलांची ही मागणी न्यायालयाने मान्य केली.
प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत आरोपी प्रशांत कोरटकरला ऑनलाईन पद्धतीने हजर करण्यात आलं होतं. तसेच इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे आणि कोरटकरचे वकील सौरभ घाग हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर कोरटकरच्या वकिलांनी तातडीने जामिनासाठी अर्ज केला. पण त्याच्या जामीन अर्जावर आता 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे. यावेळी कोरटकरला जेल की बेल मिळते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
Beed News : बीडमध्ये मशिदीत स्फोट, आरोपीचा स्फोट घडवण्याआधी सोशल मीडियावर रील, वाचा A टू Z बातमी
प्रशांत कोरटकरच्या वकिलाची मोठी मागणी
दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी प्रशांत कोरटकरच्या वकिलाकडून महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला. कोरटकरवर नुकतंच न्यायालयाच्या आवारात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेचा उल्लेख करत प्रशांत कोरटकरचा वकील सौरभ घाग यांनी कोरटकरसाठी कारागृहात स्वतंत्र आणि सुरक्षित कोठडी मिळावी, अशी विनंती केली. कोरटकरवर न्यायालय परिसरातच दोनवेळा गल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी विनंती वकील सौरभ घाग यांनी केली. न्यायालयाने सौरभ घाग यांची विनंती मान्य केली आणि प्रशासनाला तशा सूचनादेखील दिल्या.

