म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मासे खाताना घशात काटा अडकल्यानंतर केळे, भाताचा गोळा किंवा ब्रेड खाल्ल्यास काटा खाली जाईल, असा अनेकांचा समज आहे. मात्र, हा उपाय जिवावरही बेतू शकतो. घशात अडकलेला माशाचा काटा मानेच्या आतील मऊ ऊतींमध्ये खोलवर जाऊन गंभीर संसर्ग, पूसंचय, श्वासनलिकेवर दाब आणि जीवघेणी गुंतागुंत निर्माण करू शकतो, असा इशारा ईएनटी तज्ज्ञांनी दिला आहे.
अशाच दोन रुग्णांवर अलीकडे यशस्वी उपचार करण्यात आले. एका ५३ वर्षीय महिलेच्या घशात अडकलेला माशाचा काटा मानेत खोलवर जाऊन फोड तयार झाला होता. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने उपचार अधिक गुंतागुंतीचे झाले. दुसऱ्या ६० वर्षीय रुग्णाने काटा बाहेर पडावा म्हणून भाताची मूद आणि केळे खाल्ले; मात्र काटा अधिक आत गेल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. ५३ वर्षीय महिला रुग्णाच्या प्राथमिक तपासणीत व्हिडिओ लॅरिंगोस्कोपीदरम्यान घशाच्या उजव्या बाजूला सूज आढळली; मात्र काटा दिसत नव्हता. त्यानंतर करण्यात आलेल्या सीईसीटी स्कॅनमध्ये काटा घशातून बाहेर पडून मानेच्या आत वरच्या भागात खोलवर अडकला असल्याचे निदान झाले. त्या ठिकाणी पू साचून फोडही तयार झाला होता. तपासणीदरम्यान रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि रक्तदाबही वाढला. पुढील हृदय तपासणीत त्यांना एनएसटीईएमआय प्रकारचा हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. अँजिओग्राफीमध्ये हृदयाच्या अनेक रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्याचेही दिसून आले. रेडिओलॉजिस्ट डॉ. विष्णू पुजारी, कार्डिओलॉजिस्ट डॉ. तमीरुद्दीन दानावडे, भूलतज्ज्ञ डॉ. मेघना चौधरी आणि ईएनटी तज्ज्ञ डॉ. राजेंद्र वाघेला यांच्या पथकाने अल्ट्रासाऊंडच्या साहाय्याने काट्याचे अचूक स्थान निश्चित केले. मानेतील हायॉइड हाडाजवळील मऊ ऊतींमध्ये अडकलेला काटा सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. सुमारे एका तासात ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. त्यानंतर रुग्णावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
दुसऱ्या प्रकरणात पनवेल येथील ६० वर्षीय नरेश मोरे (नाव बदलले आहे) या शिक्षकांच्या घशात मासे खाताना काटा अडकला. तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर त्यांनी भाताची मूद खाऊन काटा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून आराम मिळाला रुग्णालयात नाही. जवळच्या गेल्यानंतरही सुरुवातीला नेमके निदान झाले नाही. अखेरीस काटा अधिक आत गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शस्त्रक्रिया करून तो बाहेर काढावा लागला. ईएनटी तज्ज्ञ डॉ. राजेंद्र वाघेला यांनी अशा तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला दिला. घशात काटा अडकल्यास कोणतेही घरगुती उपाय करण्याऐवजी तातडीने ईएनटी तज्ज्ञांकडे जाणे आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या मते, मासे खाल्ल्यानंतर घशात सतत वेदना जाणवणे, सूज येणे, काहीतरी अडकल्याची भावना राहणे, गिळताना किंवा श्वास घेताना त्रास होणे, छातीत किंवा घशात तीव्र वेदना होणे अथवा रक्त येणे अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता वैद्यकीय उपचार घ्यावेत. वेळेत उपचार मिळाल्यास अनेकदा शस्त्रक्रियेविना काटा काढणे शक्य होते आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा