• Thu. Apr 24th, 2025 3:02:20 PM

    ‘राज्याचे गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले, आता सातारच्या आकाला वाचवतायेत’; संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

    ‘राज्याचे गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले, आता सातारच्या आकाला वाचवतायेत’; संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

    Sanajay Raut Marathi News : सातारचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर झालेल्या आरोपांवर, मुख्यमंती देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका करत महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था वाचवण्याचे प्रयत्न गृहमंत्री करत नसल्याचा आरोप केला. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पक्षाचा हक्क नसल्याचं त्यांनी म्हटलं.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : सातारचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केले होते. विधानसभा अधिवेशनामध्ये हे प्रकरण चर्चेत आले होते. या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. अशातच या प्रकरणाचा धागा पकडत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

    या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न गृहमंत्री करत होते. आता सातारच्या एका आकाला वाचवत आहेत. कुणाल कामराच्या स्टुडिओवर हल्ला करणारे आणि कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था अत्यंत दारूण झाली आहे. याचं कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना वाघ्या श्वानाच्या समाधीवरून चाललेल्या वादावरही राऊत बोलले.

    मनोहर भिडे आणि छत्रपती संभाजी यांनी एकत्र बसून तो मामला पुढे न्यावा, महाराष्ट्राला त्यात ओढू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरचे सगळेच मावळे, प्राणी आणि पक्षी हे निष्ठावान म्हणून गणले जातात. इतिहासामध्ये काही दाखले काही संदर्भ ते इतक्या वर्षानंतर खोदकाम करणं योग्य नाही. लोकांनी काही संदर्भ भावनिकदृष्या स्वीकारले असतात. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होतील अशी भूमिका कोणत्याही शहाण्या नेत्याने घेऊ नये, या मताचे आम्ही आहोत. ताराराणी यांनी औरंगजेबाला झुंजवलं आणि मराठ्यांचं शौर्य काय आहे हे दाखवलं. ज्या लोकांना औरंगजेबाची कदर उद्ध्वस्त करायची आहे त्यांनी ताराराणींच्या स्मारकाकडे नजर टाकावी आणि आपलं काही चुकतंय का हे पाहावं असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

    बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरूषांचा दर्जा दिला आहे तसा ठराव मंजूर झाला आणि तशी मान्यता आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या बाळासाहेबांचा फोटो कोणीही वापरू शकतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं फावलं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरूषांच्या यादीत असल्याने त्यांच्यावर व्यक्तिगत किंवा पक्षाचा हक्क असू शकत नसल्याचं राऊतांनी सांगितलं.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed