Kishori Pednekar on Disha Salian Case : दिशा सालियन पोस्टमार्टेम रिपोर्टवर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये दिशावर कोणत्याही प्रकरचा अत्याचार किंवा बलात्कार झाला नसल्याचं म्हटलं आहे. पण विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या आरोपांवरुन किशोरी पेडणेकर संतापल्या.
किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
“ज्या दिवशी ती पडली असेल, आम्ही तिला ओळखतही नव्हतो. ज्या दिवशी ती पडली असेल त्यावेळी लगचे पोलीस तक्रार तर झाली असेल. पोलीस पोहोचले असतील. मुंबईच्या पोलिसांवर एवढा तरी आपला विश्वास असायला हवा. कुठलाही एखादा असा मृत्यू होतो, उलट त्या प्रकरणात सगळं बघितलं जातं. पीएम रिपोर्ट मिळाल्यानंतर ही तुमच्या संशयाच्या सुया घुसवतच राहायच्या. अरे तुमच्या मेंदूत काय किडे पडले आहेत काय? अरे तुम्ही आमदार आहात ना? तुम्ही लोकांना दिशा द्यायची की दिशाहीन करायचं?”, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.
“आम्ही तर पहिल्या दिवसापासून, आदित्य ठाकरे यांनीदेखील पहिल्या दिवसापासून सांगितलं की, चौकशी करा. फक्त तुमची जी बकवास चालली आहे, त्याचा तिटकारा येतो. राग येतो. तुम्हाला कोणी अडवलं आहे, चौकशी कराना. तुम्हाला मागच्या 5 वर्षात अडवले होते? काहीही आरोप करणार ते स्वीकारायचं ही जबरदस्ती आहे का?”, असा घणाघात किशोरी पेडणेकर यांनी केला.मोठी बातमी! देशभरात UPI सेवा ठप्प, Google Pay, Phone Pay, PayTM करायला अडचणी
“आम्ही सांगतोय हो, आम्ही दिशाच्या कुटुंबियांना भेटलो. पण मी एकटी भेटली नव्हती. माझ्याबरोबर पोलीस होते. मीडिया प्रतिनिधी होते. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यादेखील येणार होत्या. त्यांना सातत्याने त्यांची पत्रे येत होती. पण रुपाली चाकणकर यांनी ऐनवेळी येणं रद्द केलं. त्यांच्या इतर कामांमुळे त्या येऊ शकल्या नव्हत्या”, अशी देखील प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.