Udayanraje Bhosale on Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण फौजेमध्ये किंवा सहकाऱ्यांमध्ये विविध जाती धर्माचे लोक होते, मुस्लीम होते, हिंदू होते, इतर समाजातील लोकही होते, असं नाही की फक्त मराठा समाजाचे होते, मुस्लीमही होते, महत्त्वाच्या पदावर होते” असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं.
उदयनराजे काय म्हणाले?
छत्रपती उदयनराजे भोसले यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, की “मंत्री नितेश राणे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम सैनिक नव्हते, मात्र तुम्ही म्हणता की शिवराय सर्वधर्मसमभाव जपणारे होते. चौथीच्या पुस्तकात याचे दाखले आहेत, अभ्यासक्रमात उल्लेख आहे. नितेश राणे सातत्याने अशी वक्तव्य करत आहेत, मग त्यांना समज द्यायला हवी की त्यांचा अभ्यास घ्यायला हवा?” असा प्रश्न पत्रकारांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांना विचारला.
HSRP Number Plate : गाडी २०१९ नंतर घेतली, तरी एचएसआरपी नंबरप्लेट नाही, अर्जही भरता येईना; पुण्यात वाहन चालकांचा संताप, उपाय काय?
उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, “नाही, एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण फौजेमध्ये किंवा सहकाऱ्यांमध्ये विविध जाती धर्माचे लोक होते, मुस्लीम होते, हिंदू होते, इतर समाजातील लोकही होते, असं नाही की फक्त मराठा समाजाचे होते, मुस्लीमही होते, महत्त्वाच्या पदावर होते” असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं.
वक्तव्य करणं स्वाभाविक
“नितेश राणे यांनी भावनेच्या आहारी जाऊन… मला वाटतं त्यांनी असं वक्तव्य करणं स्वाभाविक आहे. कारण ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे हालहाल केले गेले, स्वाभाविकपणे आपण रागारागात आपलं मत व्यक्त करतो.” अशी सारवासारव उदयनराजे यांनी केली.
Nagpur Violence News : नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात, गृहराज्यमंत्र्यांची माहिती, घटनेचं मूळ कारण काय? योगेश कदम म्हणाले…
राजीनामा मागण्याची फॅशन
पुढे, नागपूरच्या राड्याला नितेश राणे जबाबदार आहेत, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, राजीनामा घ्यावा अशी मागणी होत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, उदयनराजे म्हणाले की “अलिकडे राजीनामा मागण्याची फॅशन झाली आहे. या अगोदर पाहिलं तर, या सगळ्याला कारणीभूत कोण आहे? खऱ्या अर्थाने लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम काँग्रेसने केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन त्यांनी काम करायला पाहिजे होतं.” असं मत यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं.

