Ramesh Mhatre Case: आता केवळ भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १८३ अंतर्गत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सुरक्षा रक्षकांचे जबाब नोंदवणे बाकी आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक होऊन जामीन मिळाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा कोठडीत जावे लागलेले म्हात्रे यांच्या जामिनाच्या विनंतीविषयी खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा, सर्वप्रथम मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वाखालील तपासाची सद्यस्थिती मांडली. ‘सर्व पीडित व साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
Chandrashekhar Bawankule : सावजीच्या वादात बावनकुळेंची उडी, तुकाराम मुंढेंना काय दिला सल्ला?संबंधितांचे आवाजाचे नमुने व इलेक्ट्रॉनिक पुरावे न्यायसहायक प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत’, असे हिरे यांनी सांगितले. तेव्हा, ‘प्रभावी तपास आणि आरोपपत्र विशिष्ट कालमर्यादेत होणार असेल तरच कठोर अटी घालून आरोपींच्या जामिनाच्या विनंतीचा विचार करावा. कारण हा गुन्हा केवळ दोन डॉक्टरांवरील हल्ल्याचा नाही, तर सार्वजनिक सुव्यवस्थेचाही आहे.
आरोपींविरोधातील खटलाही जलद होऊन निर्णय यायला हवा तरच राजकीय क्षेत्रातही योग्य तो संदेश जाईल’, असे म्हणणे ‘न्यायालय मित्र’ म्हणून साह्य करणारे ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी मांडले. ‘या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत. त्याच्याशी छेडछाड होण्याची शक्यता नाही तरीही महाराष्ट्राबाहेर राहण्यासह अन्य कठोर अटी मान्य असतील’, असे म्हणणे म्हात्रेंतर्फे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी मांडले.
Raj Thackeray Nashik Daura: ऐंशी लाख नाव वगळण्याचा डाव, SIR मोहिमेवर राज ठाकरे यांना शंका
इतर प्रकरणांत २४ तासांत घोषणा कशी ?
खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीची सूचना अॅड. मुंदरगी यांनी केल्यानंतर अशी नियुक्ती कधीपर्यंत करणार, अशी विचारणा खंडपीठाने हिरे यांना केली. तेव्हा, आरोपपत्रानंतर दहा दिवसांत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मात्र, काही प्रकरणांत २४ तासांत विशेष सरकारी वकील नेमल्याची घोषणा सरकार करते. याप्रकरणात इतके दिवस का, असा प्रश्न खंडपीठाने केला.
