Raj Thackeray Nashik Daura: सिंहस्थ आणि नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवार (दि. ६) पासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत.
शासकीय विश्रामगृहावर ठाकरे यांनी शाखा अध्यक्षांसह १५ तालुक्यातील पदाधिकारी आणि पक्षाच्या ‘बीएलए’सोबत बैठकांचे सत्र सुरू केले. निवडणूक आयोगाकडून सध्या एसआयआर मोहीम सुरू असून, मतदारांची पडताळणी केली जात आहे. परंतु, अजूनही मतदार सजग नसल्यामुळे मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे गायब केली जाण्याची शंका ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. पश्चिम बंगालमध्ये एक कोटी नावे गायब केली. त्याच धर्तीवर राज्यातही ८० लाखांपेक्षा अधिक नावे गायब केली जाणार असल्याची शंका ठाकरे यांनी व्यक्त केली.
Raj Thackeray : ताटकळत ठेवल्याने संतापले, गोल्ड मेडलिस्ट खेळाडू राज ठाकरेंची भेट न घेताच कोचसह निघून गेलाराज ठाकरे यांची‘जेन झी’ला भुरळ
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसह खड्ड्यांमुळे त्रस्त झालेली नाशिकमधील तरुणाईला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भुरळ पडल्याचे चित्र गुरुवारी (दि.६) पहायला मिळाले. ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान तरुणांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली, त्यात ‘जेन झी’चेही प्रमाण मोठे होते. त्यामुळे तरुणाईंत ठाकरेंची ‘क्रेझ’ कायम असल्याची चर्चा सुरू होती.
मनसेच्या स्थापनेनंतर नाशिक हा मनसेचा गड राहिला होता. तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता राज ठाकरेंच्या हातात सोपवली होती. सिंहस्थ कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन आणि चांगली विकासकामे करूनही पदाधिकाऱ्यांमधील राजकारणामुळे नाशिकमध्ये मनसेचे ‘पानीपत’ झाले होते. नाशिकच्या मतदारांनी नाकारल्यानंतर ठाकरेही नाशिककरांवर नाराज झाले होते. पण सध्या राज यांच्याकडे तरुणाईचा कल वाढल्याचे पहायला मिळाले.
Nashik Crime: पार्सलमधून चोरले महागडे मोबाइल; नाशकात संशयित अटकेत, साडेअठरा लाखांचे 13 मोबाइल जप्तनाशिकच्या प्रश्नांचा आढावा
‘शेतकरी, जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक व्हा,’ असा सल्ला राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला. नाशिकमध्ये सध्या सुरू असलेल्या प्रश्नांचाही ठाकरेंनी निवडक पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. सध्या सिंहस्थाची सुरू असलेली निकृष्ट कामे, पावसाळ्यात खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये होत असलेले मृत्यू व अपघाताची माहिती ठाकरेंनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
