म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: सरकारची एखादी नवीन योजना, प्रसिद्ध सेवा किंवा अन्य काहीही प्रचलित दिसले की, त्याच्यावर सर्वांत पहिली नजर सायबरचोरांची पडते. सरकारचा उपक्रम असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्पडताळणी मोहीम (एसआयआर)च्या बाबतीतही तसेच काहीसे घडत आहे. ‘एसआयआर’चा वापर करून सायबरचोर सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती रिकामी करीत आहेत.
मतदारयादीतील घोळ सुधारण्यासाठी विशेष मतदारयादी पुनर्पडताळणी मोहीम (एसआयआर) राबविण्यात येत आहे. सरकारच्या चांगल्या उपक्रमाचा गैरफायदा सायबरचोर घेत असल्याच्या घटना मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतून समोर येत आहेत. एल अँड टी कंपनीतून निवृत्त झालेले ७९ वर्षीय वृद्ध चेंबूर येथे वास्तव्यास आहेत. १ ऑगस्ट रोजी त्यांना एका व्यक्तीने फोन केला. निवडणूक आयुक्त चंद्रशेखर बोलत असल्याचे सांगत त्याने वृद्धाला त्याच्या मतदारयादीतील तपशिलाबाबत माहिती दिली. तुमचे नाव मतदारयादीत आहे, मात्र पत्ता जुना दाखवत असल्याचे त्याने सांगितले. नवीन पत्ता टाकण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा वृद्धाने केली. त्यावर एक लिंक पाठवतो, त्यावर जाऊन फाइल डाउनलोड करा आणि आपला नवीन पत्ता टाका, अपडेट होईल, असे चंद्रशेखर म्हणाला. काही वेळातच वृद्धाच्या मोबाइलवर लिंक आली आणि निवडणूक आयोगाच्या नावाशी साधर्म्य असणारी लिंक असल्याने वृद्धाने त्यावर क्लिक केले. लिंकवर क्लिक करताच एक एपीके फाइल डाउनलोड केली.
एपीके फाइलवरही निवडणूक आयोगाचे नाव आणि त्यासारखेच चिन्ह असल्याने वृद्धाने आपले नाव आणि नवीन पत्त्याचा तपशील भरला. तपशील भरण्यात व्यग्र असतानाच त्यांना एका पाठोपाठ एक संदेश येत होते. हे संदेश पाहिले असता त्यांच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे वळते केले जात होते. वृद्धाने याबाबत बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यामधून ११ लाख २८ हजार रुपये काढण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचे त्यांनी पूर्व विभाग सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली.
निवृत्त डॉक्टरची फसवणूक
निवडणूक आयोगाच्या नावाने एक संदेश पाठवून सायबर चोरांनी बीएआरसीच्या निवृत्त डॉक्टरला ६.७१ लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या नावे त्यांना एक संदेश प्राप्त झाला. त्यात नियमानुसार तुमचे आणि तुमच्या वडिलांचे नाव जुळत नाही, असे नमूद केले. त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवली जाईल, असे सांगत माहिती भरून पाच रुपये शुल्क भरण्यास सांगण्यात आले. पाच रुपये ऑनलाइन भरण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांच्या खात्यातून ६.७१ लाख रुपये काढून घेतले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा