sharad pawar news : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येंबद्दल बोलताना नुकताच शरद पवार हे दिसले आहेत. काल जयंत पाटलांनी शरद पवार यांची भेट बारामतीमध्ये जाऊन घेतली. या भेटीबद्दल बोलतानाही शरद पवार हे दिसले आहेत. जयंत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.
पुढे शरद पवार म्हणाले की, निवडणुका होत राहतात, पुढच्या निवडणुकांवर अजून ठरवलं नाहीये. जयंत पाटील हे पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा सातत्याने रंगताना दिसतंय, याबद्दल एक विधान जयंत पाटलांनी केले होते. त्यानंतर जयंत पाटील हे काल बारामतीमध्ये गेले होते, यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, जयंत पाटलांनी त्यांची भूमिका कालच स्पष्ट केलीये. बीडबद्दल बोलताना पवार म्हणाले, बीडमध्ये मी स्वत:लक्ष देत होतो, निर्णय घेत होतो. आता मात्र, परिस्थिती बिघडली आहे.
Sanjay Raut : अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपाच्या ताटाखालची मांजरे, संजय राऊतांची जोरदार टीकायावेळी राज्यातील प्रश्न विचारू नका राष्ट्रीय विचारा असेही शरद पवार यांनी म्हटले. एआयचा वापर करू पिक घेतले जातंय. एआयमुळे ऊसाला पाणी कमी लागेल. एआयचा कृषी क्षेत्रात वापर करणार असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले. एआयमुळे कृषी क्षेत्राला मोठी मदत होत आहे. अजित पवार यांचा लेक जय पवार यांचा साखरपुडा आहे आणि जय पवार आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीने शरद पवारांची भेट घेतली. जय पवारच्या साखरपुड्याला जाणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला असता ते भडकले आणि म्हणाले की, हा काही प्रश्न आहे का विचारायचा?.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी मस्साजोगला जाऊन देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वैभवी देशमुख हिचा शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलणार असल्याचे देखील म्हटले. बारामतीमध्ये तिच्या शिक्षणाची पूर्ण सोय करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. अंजली दमानिया यांनी केजच्या न्यायाधिशाचे होळी खेळतानाचा फोटो शेअर केला, यावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी भाष्य करणे टाळले असल्याचे बघायला मिळाली.

