Lilavati Hospital Black Magic News in Marathi: मुंबईमधील नामांकित लीलावती रूग्णालयामधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काळी जादू झाल्याचं निदर्शनास आले असून त्यासोबतच १,२५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विश्वस्तांनी केलाय, नेमका काय प्रकार जाणून घ्या.
लीलावती रूग्णालयाचं संस्थापक किशोर मेहता यांचे भाऊ विजय मेहता आणि त्यांचे नातेवाईक आणि सहकाऱ्यांविरूद्ध आर्थिक अनियमिततेप्रकरणी तीन एफआयआर दाखल झालेत. त्यासोबतच टॅक्सचोरीची तक्रारसुद्धा करण्यात आलीय. तर आताच्या विद्यमान विश्वस्तांनी तक्रार केली असून याचा तपास केला जावा अशी मागणी केली आहे. माजी विश्वस्त कथित स्वरूपाच युएई आणि बेल्जियला गेले आहेत.
रूग्णालयातील कर्माचाऱ्यांना माजी विश्वस्तांविरूद्ध प्रशांत मेहता आमि त्यांच्या आईला इजा पोहोचवण्यासाठी काळी जादू केल्याची तक्रार दाखल केलीय. विजय मेहता यांच्या मुलाने आरोप फेटाळले असून फक्त खळबळ माजवण्यासाठी हे आरोप केल्याचं म्हटलं आहे.
२००२ मध्ये किशोर मेहता हे उपचारासाठी परदेशात गेले होते. त्यावेळी त्यांचा भाऊ विजय मेहता यांनी तात्पुरता कारभार स्वीकारला होता. मात्र त्यानंतर खोटी कागदपत्रांच्या आणि सहीने मदतीने कथित स्वरूपात आपल्या मुलाला आणि पुतण्याला विश्वस्त म्हणून नियु्क्त केलं. त्यानंतर कायदेशीर लढाईनंतर २०१६ सारी किशोर मेहता यांनी आपलं पद कायम मिळवलं. २०२४ मध्ये मेहता यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा प्रशांत मेहता विश्वस्त झाले. त्यानंतर ऑडिट केल्यावर खोटे रेकॉर्ड समोर आले.
दरम्यान, मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध म्हणून लीलावती रूग्णालयाची ओळख आहे. मोठे सेलिब्रिटी, उद्योगपती आणि खेळाडू तिथे उपचार घेतात. अशा रूग्णालयात हा प्रकार समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.