• Sun. Jun 7th, 2026
    Sandeep Kshirsagar : संदीप क्षीरसागर यांची नायब तहसीलदाराला धमकी देतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

    Sandeep Kshirsagar Audio Clip Viral : आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संदीप क्षीरसागर हे नायब तहसीलदारांना धमकी देताना दिसत आहेत. या कथित ऑडिओ क्लिपची आम्ही पुष्टी करत नाहीत. पण यातील संभाषण फार धक्कादायक आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. पण संदीप क्षीरसागर यांच्याकडून नायब तहसीलदाराला धमकी देतानाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कथित ऑडिओ क्लिपमध्ये संदीप क्षीरसागर हे बीडच्या नायब तहसीलदारांना धमकावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. संदीप क्षीरसागर हे बीडचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांना ग्राम रोजगार सेवकाबद्दल तक्रार करु नको, अशी धमकी देत आहेत. संबंधित क्लिप ही 2023 ची असल्याची माहिती आहे.

    या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण अतिशय धक्कादायक आहे. “सहा महिन्यात सरकार आलं की, तू महाराष्ट्रात कुठेही असला तरी तुला सोडणार नाही. तुझे नाटकं मीच बघेन. कुठेही गेला तरी, महाराष्ट्राच्या बाहेर तरी जाणार नाही ना तू?”, असं धक्कादायक वक्तव्य संदीप क्षीरसागर करत असल्याचं कथित ऑडिओ क्लिपमध्ये जाणवत आहे. पण ही कथित ऑडिओ क्लिप कितपत खरी आहे? याबाबत दावा केला जाऊ शकत नाही. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    Avinash Jadhav : मनसे-भाजपात वितुष्ट? अविनाश जाधव म्हणाले, ‘भाजपचे चोंगे भक्त आता…’

    कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण काय?

    संदीप क्षीरसागर : डोके साहेब, ते उमरत खालजी विषयात तुम्ही ग्राम रोजगार सेवकाला कशामुळे नोटीस काढली?

    नायब तहसीलदार : साहेब, ती त्याच्याविरोधात तक्रार आली होती.

    संदीप क्षीरसागर : कशाची तक्रार?

    नायब तहसीलदार : हो मग सुनावणी घेतोय त्या प्रकरणात. पुढची प्रोसेस करतो.

    संदीप क्षीरसागर : डोके, एकतर तुम्ही माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतला आहे. तुम्हाला असं वाटतंय ना, सहा महिन्यात सरकार आलं की, तू महाराष्ट्रात कुठेही असला तरी तुला सोडणार नाही बरं का, मी तुला सांगतो. तू माझ्या मतदारसंघात तमाशे करु नको बरं का.

    नायब तहसीलदार : नाही साहेब, चौकशी करतो ना, पूर्ण प्रोसेस तर करुन घेतो ना.

    संदीप क्षीरसागर : तुझे नाटकं मीच बघेन बरं का कुठेही गेला तरी, महाराष्ट्राच्या बाहेर तरी जाणार नाही ना तुला? या विषयात याला बिलकुल अडचण यायला नको. रोजगार सेवकाला बरं का?

    नायब तहसीलदार : करुन घेतो साहेब!

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed