• Mon. Jun 15th, 2026

    नवीन शाळांना मान्यता व विद्यमान शाळांच्या दर्जावाढ प्रस्तावाची छाननी यादी प्रसिद्ध – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 7, 2025
    नवीन शाळांना मान्यता व विद्यमान शाळांच्या दर्जावाढ प्रस्तावाची छाननी यादी प्रसिद्ध – महासंवाद




    मुंबई, दि. ०७: महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम , २०१२ अंतर्गत नवीन शाळांना मान्यता व विद्यमान शाळांचे दर्जावाढ करण्यासाठी २४१ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

    या प्रस्तावाची छाननी करून पात्र झालेल्या शाळांची यादी www.mahasfs.org/   www.education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे मुंबईचे क्षेत्रस्तरीय प्राधिकरण तथा विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

    काही हरकती व सूचना असल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई कार्यालयास कळविण्यात यावे, असेही प्रसिद्ध पत्रकात नमूद आहे.

    ०००

    मोहिनी राणे/स.सं







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed