• Sun. Mar 15th, 2026

    Trupti Desai : ‘सुरेश धसांचं देशमुखांना न्याय देण्याचं ध्येय नव्हतं, मुंडेंचं वर्चस्व संपवत…’; तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप

    Trupti Desai : ‘सुरेश धसांचं देशमुखांना न्याय देण्याचं ध्येय नव्हतं, मुंडेंचं वर्चस्व संपवत…’; तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप

    Authored byहरिश मालुसरे | Contributed by अभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Mar 2025, 1:04 pm

    Trupti Desai on Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांचा खोक्या उर्फ सतीश भोसले याचे अनधिकृत कृत्ये उघडकीस आली आहेत. सुरेश धस यांचे खोक्यास पाठबळ असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी धस यांच्यावर टीका केली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस त्यांच्याय एका माणसामुळे अडचणीत सापडले आहेत. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसले याचे नवनवीन कारनामे समोर येताना दिसतायेत. हाच खोक्या क्रूरप्रकारे मारहाण करत असल्याचे धक्कादायक व्हिडीओ समोर आलेत. त्यासोबतच वन्य प्राण्यांची शिकार करत असल्याचा आरोप शिरूर परिसरातील वन्यजीवप्रेमी माऊली शिरसाटांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय.

    बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसत आहे. सुरेश धस आता आकाच निघाले आहेत. त्यांचेही कार्यकर्ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण सुरेश धस नेमके आवाज का उठवत होते. संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं त्यांचं ध्येय नव्हतं. तर धनंजय मुंडे यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती. मला वाटतं की बीड जिल्ह्यातील जे काही सगळे नेते असतील आणि त्यांचे असे कार्यकर्ते असतील तर त्यांच्यावर कारावाई करणं गरजेचं असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

    खोक्या उर्फ सतीश भोसले आणि सुरेश धस यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये सुरेश धस हे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छ देत असून १०० टक्के आपला आशिर्वाद तुझ्या पाठिमागे असल्याचं म्हणत आहेत. सुरेश धस यांनीहा तो कार्यकर्ता आपलाच असल्याचं मान्य केलं आहे. मात्र आता खोक्याचे अनेक व्हिडीओ समोर येऊ लागलेत ज्यामध्ये त्याचा उन्माद दिसत आहे.

    दरम्यान, सतीश भोसले उर्फ खोक्याने शेकडो वन्य जीवयात हरिण काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली. असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. जवळपास 200 हून अधिक हरीण आणि काळवीट मारले आहेत. तसेच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसच हरणांच्या अवशेष असल्याचा दावा वन्यजीव प्रेमी माऊली शिरसाठ यांनी केला आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed