अबू आझमी वर देशद्रोहाचा खटला दाखल करावा सामाजिक कार्यकर्ते दिनेश जोशी यांची मागणी
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गुणगान करणारे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी केले. त्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या असून अबू आझमी आणि अशा देशविघातक मानसिकतेच्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश जोशी यांनी पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या औरंगजेबाने अनन्वित अत्याचार करुन मारले, ज्या औरंगजेबाने भारतभर मंदिरे उध्वस्त केली. येथील हिंदू धर्मीयांचा छळ केला त्या औरंगजेबाचा खरा इतिहास न वाचता, अबू आझमी सारखी व्यक्ती त्याचे गुणगाण गात आहे. अशा मानसिकतेच्या लोकांना समाजात धार्मिक दंगली घडवून आणायच्या आहेत का? या लोकांच्या असे जाणीवपूर्वक वक्तव्यामागचे मनसुबे काय आहेत, ह्याचीही चौकशी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच भारतात कुठेही औरंगजेबाचे गुणगान गाणारी जमात दिसेल, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणीही दिनेश जोशी यांनी केली आहे.