• Sun. Mar 8th, 2026

    Pankaja Munde : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच भावाच्या भेटीला

    Pankaja Munde : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच भावाच्या भेटीला

    Pankaja Munde Meet Dhananjay Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच त्यांची भेट घेत आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : भाजप नेत्या तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर जावून त्यांची भेट घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे या त्यांच्या भेटीसाठी गेल्या आहेत. त्यामुळे या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली आहे. तसेच त्यांना बेल्स पाल्सी आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या या कठीण काळात त्यांच्यावर संतोष देशमुख प्रकरणात गंभीर आरोप झाले. तसेच त्यांचा जवळचाच व्यक्ती या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं समोर आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या. या प्रकरणातील फोटो समोर आल्यामुळे त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला.

    बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी वाल्मिक कराड हा संतोष देशमुख प्रकरणात जेलमध्ये गेला आहे. सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला मास्टरमाईंड असल्याचं म्हटलं आहे. वाल्मिक कराड यानेच देशमुखांच्या हत्येचा कट रचला. त्याच्या आदेशानंतरच आरोपींनी देशमुखांची निर्घृणपणे हत्या केली, असं आरोपपत्रात म्हटलं आहे.
    Gunratna Sadawarte : ‘राज ठाकरे तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या?’ गुणरत्न सदावर्ते यांचा घणाघात, भय्याजी जोशींचं समर्थन
    बीडच्या घटनेवरुन विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल जात होती. पण धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नव्हता. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सिंचन विभागाचे आरोप झाले तेव्हा मला स्वत:ला राजीनामा द्यावा लागला होता. तसेच अनेक दिग्गज नेत्यांना आरोपांनंतर मंत्रिपदाचा राजीनामा झाला होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा की नाही याबाबत विचार करावा, असं म्हणत अप्रत्यक्षपणे राजीनामा मागितला होता, अशी चर्चा आहे. पण तरीही मुंडेंनी राजीनामा दिला नव्हता. अखेर संतोष देशमुखांचे कसे हालहाल करुन हत्या करण्यात आली त्याचे फोटो समोर आल्यानंतर मुंडेंनी राजीनामा दिला.
    Maharashtra Politics : विधानसभेत हंगामा, सत्ताधारी सुधीर मुनगंटीवार यांनीच कृषीमंत्र्यांना सुनावलं
    पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली होती. धनंजय मुंडे यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता. त्यांच्या राजीनाम्याला उशिर झाला, असं स्पष्ट मत पंकजा मुंडे यांनी मांडलं होतं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यापेक्षा त्यांना आधीच मंत्रिपदाची शपथ द्यायला नको होती. त्यामुळे कदाचित पुढच्या भागांना सामोरे जावं लागलं नसतं, असं रोखठोक मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं होतं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed